अभिनेत्री जयाप्रदा भाजपच्या वाटेवर

By Admin | Updated: January 31, 2015 02:03 IST2015-01-31T02:03:10+5:302015-01-31T02:03:50+5:30

समाजवादी पक्षातून निलंबित झालेल्या जयाप्रदाचा भाजपच्या तंबूत शिरण्याचा प्रयत्न सुरू असून, तसे करून आपण फक्त सेवाकार्य करू इच्छितो,

Actress Jaya Prada on the way to BJP | अभिनेत्री जयाप्रदा भाजपच्या वाटेवर

अभिनेत्री जयाप्रदा भाजपच्या वाटेवर

नवी दिल्ली : समाजवादी पक्षातून निलंबित झालेल्या जयाप्रदाचा भाजपच्या तंबूत शिरण्याचा प्रयत्न सुरू असून, तसे करून आपण फक्त सेवाकार्य करू इच्छितो, कुठल्याही पदाची लालसा आपल्याला नाही, असे या अभिनेत्रीचे म्हणणे आहे. भाजपमध्ये सामील होण्याकरिता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा सुरू असून कुठलीही निवडणूक लढविण्यात आपल्याला रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
केजरीवाल यांच्या विरुद्ध मैदानात उतरण्याच्या शक्यतेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी, मी तसे कधी म्हटले नाही, मला भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे. मात्र प्रसिद्धीमाध्यमांनी त्याला जास्त फुगवून सांगितले. तिकीट वाटपाबाबत मी काही बोलले नाही असे म्हटले.
 

Web Title: Actress Jaya Prada on the way to BJP