शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता सोनू सूद लॉन्च करतोय 'Sonu For You App', रुग्णांना मिळणार दिलासा; होणार मोठा फायदा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 19:07 IST

आपल्या आयुष्यातील 20 मिनिटे या रुग्णाच्या नावे द्यावे लागतील. यामुळे मृत्यूशी झुंज देत असलेल्या रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता अनेक पटींनी वाढेल. (Sonu for you app)

मुंबई - लॉकडाउन काळात गरजू नागरिकांसाठी अक्षरशः देवदूत म्हणून समोर आलेला अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आता गरजू रुग्णांसाठी धावून आला आहे. आता सोनू एक खास अ‍ॅप (Sonu For You) लॉन्च करत आहे. यामुळे, केवळ वेळेवर रक्त मिळाले नाही म्हणून होणाऱ्या मृत्यू दरात घट होऊ शकते. अर्थात केवळ वेळेवर रक्त मिळाले नाही, म्हणून रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल. (Actor Sonu Sood will launch Sonu for you app this app will get blood to every needy)

आई शप्पथ...म्हणत चाहत्याने मागितला स्मार्टफोन, सोनू सूदने असे दिले उत्तर

Sonu For You App करणार लॉन्च - सोनूने Sonu For You नावाने एक अ‍ॅप तयार केले आहे. यात रक्त घेणारा आणि रक्त दाता थेट एकमेकांशी जोडले जातील. म्हणजेच हे अ‍ॅप रक्त दाता आणि रुग्णांमध्ये एका सेतूचे काम करेल. या अ‍ॅपमुळे कोणत्या रुग्णाला, कुठल्या ठिकाणी रक्ताची आवश्यकता आहे. हे या अ‍ॅपच्या माध्यमाने आपल्याला अपोआप कळू शकेल. हे समजल्यानंतर, आपल्याला केवळ आपल्या आयुष्यातील 20 मिनिटे या रुग्णाच्या नावे द्यावे लागतील. यामुळे मृत्यूशी झुंज देत असलेल्या रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता अनेक पटींनी वाढेल. 

सोनू सूदने ट्विट करून दिली माहिती -अभिनेता सोनू सूदने स्वतःच आपल्या ट्विटर हॅन्डलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने अनेक महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष आकर्षित केले आहे. यात त्याने म्हटले आहे, की रोज सुमारे 12 हजार लोकांचा मृत्यू केवळ वेळेवर रक्त न मिळाल्याने होतो. आणि आपले 20 मिनिटे त्या 12 हजार लोकांचा जीव वाचविण्यासाठी मोलाचे ठरू शकतात. एवढेच नाही, तर लोकांचा जीव वाचविण्यासाठी आपल्याला डॉक्टर होण्याची आवश्यकता नाही. तर रक्तदान करा, असेही या व्हिडिओच्या माध्यमाने सोनूने सांगितले आहे.

सोनू सूदच्या मनाचा मोठेपणा: चमोली दुर्घटनेत अनाथ झालेल्या कुटुंबांना दिला आधार, चार मुलांना घेतले दत्तक

हे अ‍ॅप केव्हा लॉन्च होणार यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, मिळालेल्या माहितीवरून, हे अ‍ॅप लवकरच लॉन्च कण्याची पूर्ण तयारी झाली असल्याचे समजते. 

टॅग्स :Sonu Soodसोनू सूदBlood Bankरक्तपेढीhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरbollywoodबॉलिवूड