अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 05:41 IST2017-08-07T05:41:46+5:302017-08-07T05:41:50+5:30

मागच्या काही दिवसांपासून लीलावती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेले सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रविवारी रुग्णालय प्रशासनाने दिली. किडनीच्या समस्येमुळे काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Actor Dilip Kumar's condition is stable | अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर

अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून लीलावती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेले सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रविवारी रुग्णालय प्रशासनाने दिली. किडनीच्या समस्येमुळे काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
दिलीप कुमार यांची प्रकृती सुधारत असून, त्यांची श्वसनप्रक्रियाही पूर्ववत होत आहे. ते पूर्णपणे शुद्धीवर आहेत. ते व्हेंटिलेटरवर नसून, त्यांच्या रक्तातील क्रिटीनिनची पातळी कमी झाल्याचे डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. दिलीप कुमार यांना रुग्णालयातून कधी डिस्चार्ज देणार, याविषयी अद्याप माहिती दिली नाही. रविवारी दिलीप कुमार यांच्या टिष्ट्वटर अकाउंटवरूनही सायरा बानू यांच्यासह, डॉक्टरांची टीम दिलीप कुमार यांची उत्तम काळजी घेत असून, त्यांची प्रकृती सुधारतेय, असे टिष्ट्वट करण्यात आले.

Web Title: Actor Dilip Kumar's condition is stable