अभिनेता असिफ बसरा यांनी केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 00:38 IST2020-11-13T00:38:42+5:302020-11-13T00:38:48+5:30
काही गोष्टींमुळे निराश झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा कयास आहे.

अभिनेता असिफ बसरा यांनी केली आत्महत्या
धर्मशाला : बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या कायपोचे या चित्रपटात भूमिका केलेले अभिनेता असिफ बसरा (वय ५३ वर्षे) यांनी हिमाचल प्रदेशातील धर्मशालामध्ये मॅक्लोडगंज भागात गुरुवारी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येच्या कारणांमागचा पोलीस कसून शोध घेत आहेत. त्यासाठी काही लोकांची लवकरच चौकशी करण्यात येईल.
काही गोष्टींमुळे निराश झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा कयास आहे. सुशांतच्या आत्महत्येने बसलेल्या धक्क्यातून सावरत असलेल्या बॉलीवूडला असिफ यांच्या आत्महत्येमुळे आणखी एक धक्का बसला आहे.