संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त स्वच्छता मोहीम आबासाहेब काकडे शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचा उपक्रम
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:18+5:302014-12-20T22:27:18+5:30
अहमदनगर : संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त आबासाहेब काकडे शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्यावतीने शनिवारी शहरातून स्वच्छता फेरी काढून ठिकठिकाणी स्वच्छता केली़ विद्यार्थ्यांनी सहकार सभागृह येथून फेरीची सुरुवात करत बंगाल चौकी, शनी चौक परिसरात स्वच्छता करत पुणे बसस्थानक येथे परिसराची स्वच्छता केली़ यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष ॲड़ शिवाजी काकडे म्हणाले की, स्वच्छता अभियानात प्रशासनापेक्षा लोकसहभाग महत्त्वाचा आहे़ या अभियानात सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे़ प्रत्येकाने आपले घर, गल्ली आणि परिसर स्वच्छ ठेवला तर ही मोहीम यशस्वी होईल़ यावेळी प्रा़ सीताराम काकडे यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ यावेळी बाबासाहेब पातकळ, संजय बोबडे, जगन्नाथ बोडखे, रामनाथ घनवट, गणेश काथवटे, कवीराज बोटे, अशोक चव्हाण, किरण वडते, आबासाहेब बेडक

संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त स्वच्छता मोहीम आबासाहेब काकडे शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचा उपक्रम
अ मदनगर : संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त आबासाहेब काकडे शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्यावतीने शनिवारी शहरातून स्वच्छता फेरी काढून ठिकठिकाणी स्वच्छता केली़ विद्यार्थ्यांनी सहकार सभागृह येथून फेरीची सुरुवात करत बंगाल चौकी, शनी चौक परिसरात स्वच्छता करत पुणे बसस्थानक येथे परिसराची स्वच्छता केली़ यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष ॲड़ शिवाजी काकडे म्हणाले की, स्वच्छता अभियानात प्रशासनापेक्षा लोकसहभाग महत्त्वाचा आहे़ या अभियानात सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे़ प्रत्येकाने आपले घर, गल्ली आणि परिसर स्वच्छ ठेवला तर ही मोहीम यशस्वी होईल़ यावेळी प्रा़ सीताराम काकडे यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ यावेळी बाबासाहेब पातकळ, संजय बोबडे, जगन्नाथ बोडखे, रामनाथ घनवट, गणेश काथवटे, कवीराज बोटे, अशोक चव्हाण, किरण वडते, आबासाहेब बेडके आदी उपस्थित होते़ फोटो आहे़