शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
2
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
3
धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला
4
तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
5
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
6
ओला, चेतक, TVS, एथर आणि व्हिडापैकी कोण आहे सरस? पाहा किंमत, रेंज आणि टॉप स्पीड
7
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
8
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
9
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
10
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
11
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
12
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
13
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
15
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
16
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
17
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
18
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
19
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
20
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर

Corona Virus : चिंताजनक! देशातील कोरोना एक्टिव्ह रुग्णांची संख्या १००० पार; 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 13:35 IST

Corona Virus : दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे.

दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत सध्या कोरोनाचे १०४ एक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या एका आठवड्यात ९९ नवीन रुग्ण आढळले आहेत जे आरोग्य प्रशासन आणि नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनले आहेत. तसेच संपूर्ण देशात कोरोना एक्टिव्ह रुग्णांची संख्या एक हजाराच्या पुढे गेली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये सर्वाधिक ४३० रुग्ण आहेत, त्यानंतर महाराष्ट्र २०९ आणि दिल्ली १०४ एक्टिव्ह रुग्णांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर कर्नाटकात ३४ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या ४७ झाली आहे. गुजरातमध्ये ७६ नवीन रुग्ण आढळले आहेत, आता राज्यातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या ८३ झाली आहे. 

 "घाबरू नका, पण सतर्क राहा"; मुंबईत मे महिन्यात दररोज आढळताहेत कोरोनाचे ९ रुग्ण

हरियाणामध्ये ८ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील एक्टिव्ह प्रकरणांची संख्या ९ झाली आहे. तर राजस्थानमध्ये ११ नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत, एक्टिव्ह रुग्णांची संख्या १३ झाली आहे. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये ११ नवीन रुग्ण आढळली आहेत. उत्तर प्रदेशात १५ नवीन रुग्ण आढळले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, मास्क लावा असा सल्ला देखील देण्यात आला आहे. 

 टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?

मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईत दररोज सरासरी ९ जणांना कोरोनाची लागण होत आहे. मुंबईसह देशभरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत इंडियन मेडिकल काऊन्सिल (IMA) ने कोरोनाला घाबरू नका, पण सतर्क राहा असं म्हटलं आहे. "कोरोना व्हायरस पुन्हा परत येत आहे, परंतु त्याचा प्रभाव २०२० किंवा २०२१ सारखा नाही. कोरोना आता येत राहील, म्हणजेच दर काही महिन्यांनी त्याचं नवीन रुप दिसू शकतं" असं आयएमए कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव विजयदेवन यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdelhiदिल्लीIndiaभारत