सोशल मीडियातून द्वेष पसरविणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 02:04 AM2018-05-28T02:04:09+5:302018-05-28T02:04:09+5:30

सोशल मीडियाच्या माध्यमातून व्देष पसरविणा-या ‘की पॅड जिहादीं’विरुद्ध जम्मू - काश्मिर पोलिसांनी आता मोहिम उघडली आहे. जेणेकरुन कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवता येईल.

Action on those who spread hatred through on social media | सोशल मीडियातून द्वेष पसरविणाऱ्यांवर कारवाई

सोशल मीडियातून द्वेष पसरविणाऱ्यांवर कारवाई

Next

श्रीनगर - सोशल मीडियाच्या माध्यमातून व्देष पसरविणा-या ‘की पॅड जिहादीं’विरुद्ध जम्मू - काश्मिर पोलिसांनी आता मोहिम उघडली आहे. जेणेकरुन कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवता येईल.
अधिका-यांनी सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून व्देष पसरविणे, कोणत्याही घटनेला जातीय रंग देणे असे प्रकार सुरु आहेत. पोलिसांनी पाच व्टिटर हँडल्सविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, फेसबूक आणि व्हॉटसअ‍ॅपवर दिशाभूल करणाºया पोस्ट टाकल्याप्रकरणी सेवा देणाºया कंपन्यांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आवश्यक कारवाई करता येईल. सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर पोलीस विशेष लक्ष ठेऊन आहेत.
एका अधिकाºयाने सांगितले की, २०१६ नंतर जम्मू आणि काश्मिरात काही समूहांकडून चुकीची माहिती पसरविली जात आहे. काही पक्ष आपले राजकीय उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा चुकीच्या माहितीमुळे जातीय संघर्ष होऊ शकतो. हे लढाईचे नवे मैदान आणि नवी लढाई परंपरागत शस्त्रांपेक्षा वेगळे आहे. यातील जिहादी कॉम्युटर आणि स्मार्टफोनचा उपयोग काश्मिर खोºयातून किंवा बाहेरुन करत आहेत.
अधिकाºयांनी सांगितले की, आम्हाला कॉम्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम-इंडिया (सीईआरटी-आयएन) कडून फेसबूक व व्टिटरवरील काही पेजेस ब्लॉक करण्याबाबत तक्रारी आलेल्या आहेत. काही सिम कार्ड हे व्देष पसरविण्याचेच काम करण्यासाठी वापरले जातात. अशा व्हॉटसअ‍ॅपची सेवा कंपन्यामार्फत बंद करण्यात आली आहे.

Web Title: Action on those who spread hatred through on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.