शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीची गळाभेट घेतली म्हणून विद्यार्थी निलंबीत; सुप्रीम कोर्टात मागणार न्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 05:46 IST

एका विद्यार्थिनीला आलिंगन दिल्याबद्दल निलंबित करण्याच्या शाळेच्या कारवाईविरोधात संबंधित विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. संबंधित विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना शाळेने निलंबित केले आहे. या निर्णयावर केरळ उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय विद्यार्थ्यांने घेतला आहे.

तिरुवअनंतरपुरम : एका विद्यार्थिनीला आलिंगन दिल्याबद्दल निलंबित करण्याच्या शाळेच्या कारवाईविरोधात संबंधित विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. संबंधित विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना शाळेने निलंबित केले आहे. या निर्णयावर केरळ उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय विद्यार्थ्यांने घेतला आहे.बारावीतील हा विद्यार्थी आणि ती विद्यार्थिनी सेंट थॉमस सेंट्रल स्कूलमध्ये शिकतात. शाळेत 21 जुलै रोजी एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एका प्रतियोगीतेमध्ये विद्यार्थिनी विजेती ठरल्यानंतर त्याने अभिनंदन करताना तिला अलिंगन दिलं. त्यानंतर अलिंगन दिल्यामुळे दोघांना शाळा प्रशासनाने निलंबीत केलं. त्या दोघांना पुढील वर्षी सीबीएसईची परीक्षा द्यायची आहे, पण शाळेने निलंबीत केल्यामुळे परीक्षा देता येईल की नाही याबाबतही संभ्रम आहे.

अलिंगन घेतल्यानंतर विद्यार्थिनीने आक्षेप घेतला नव्हता वा शाळेकडे तक्रारही केली नव्हती. तरी शाळेने दोघांवर कारवाई केली. शाळेने अनुचित कारवाई केल्याने माझा मुलगा मानसिकदृष्ट्या खचला आहे, असे या मुलाच्या वडिलांनी म्हटले आहे. शाळेच्या निर्णयाविरुद्ध या मुलाच्या कुटुंबीयांनी केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे धाव घेतली होती.या विद्यार्थ्याला वर्गात बसू देण्याची परवानगी द्यावी, असे निर्देश आयोगाने शालेय प्रशासनाला दिले होते. आयोगाच्या आदेशाला शालेय व्यवस्थापनाने केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले असता उच्च न्यायालयाने शाळेचा निर्णय वैध ठरविला. त्यामुळे आता संबंधित विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.परीक्षेचा निर्णय सीबीएसईचा-शिस्त न पाळल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे. सीबीएसईने या विद्यार्थ्याबाबत काय तो निर्णय घ्यावा. सीबीएसईने या मुलाला परीक्षा देण्याची परवानगी दिल्यास आमची काहीही हरकत नाही, असे शाळेचे प्राचार्य सेबॅस्टियन जोसेफ यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयStudentविद्यार्थीHigh Courtउच्च न्यायालय