पोटासाठी कायपण... चित्तथरारक कला : नगर येथील तरूणाची उदरनिर्वाहासाठी धडपड

By Admin | Updated: May 11, 2014 00:04 IST2014-05-11T00:04:19+5:302014-05-11T00:04:19+5:30

सोलापूर :

Action for the stomach ... Painting Art: The struggle for livelihood of the city | पोटासाठी कायपण... चित्तथरारक कला : नगर येथील तरूणाची उदरनिर्वाहासाठी धडपड

पोटासाठी कायपण... चित्तथरारक कला : नगर येथील तरूणाची उदरनिर्वाहासाठी धडपड

लापूर :
दुनिया में रहना है तो...काम कर प्यारे...हात जोड के सबको सलाम कर प्यारे...या हिंदी चित्रपटाच्या गीताप्रमाणे केवळ आपले व आपल्या कुटुंबीयांचे पोट भरण्यासाठी शहरातील रस्त्यांवर आपला जीव धोक्यात घालून चित्तथरारक कसरती करीत पैसे मिळविण्यासाठी धडपड करणारा नगर येथील तरूण सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
तुमच्यासाठी कायपण...हे टी.व्ही.सिरीयलमधील वाक्य सर्वत्र प्रसिद्ध झालेले असताना, आयुष्यात पोट भरण्यासाठी कायपण करण्याची तयारी दर्शवत आपल्या अंगी असलेली जीवघेणी कला शहरात ठिकठिकाणी सादर करीत अहमदनगर जिल्‘ातील शेगाव येथील कुटुंबीय सध्या होम मैदानावर वास्तव्यास आले आहे. पूर्वापार काळापासून सर्कशीचे दृश्य सादर करीत हे कुटुंब सध्या शहरात फिरत आहे. या कुटुंबीयांतील आई, वडील यांच्या समवेत त्यांची मुलेही चित्तथरारक कला सादर करतात. यातीलच तरूण मुलगा शकील गुलाब सय्यद हा मोठ्या दोन काठ्यांवर चालून सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. समोर आलेल्या मोटरसायकलला तो रस्त्यातील छोट्या दगडाप्रमाणे ओलांडत होता. काठीला असलेले घुंगरू एकीकडे त्याच्या कलेला साद घालत होते तर दुसरीकडे त्याच्या या कृत्यामागे पोटाची आग दिसून येत होती.
डोळ्यासारख्या नाजूक अवयवाच्या पापणीने तो दीड ते दोन किलो वजनाची खुर्ची उचलून लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवीत होता. यावरच न थांबता तो रस्त्याच्या कडेला पडलेल्या फरशा गोळा करून आपल्या हाताने तीन ते चार फटक्यात तोडत होता. त्याचे वय आणि शरीर जर पाहिले तर चांगल्या चांगल्या पैलवानांना सुद्धा त्याच्या या कृत्याचे आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नव्हते. या सर्व कसरती करताना थोडी जर चूक झाली तर ती चूक जीवावर बेतणारी असते, मात्र याची तमा न बाळगता केवळ आपले व आपल्या कुटुंबीयांचे पोट हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून हा तरूण पैसे मिळविण्यासाठी धडपडताना दिसत आहे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता हे कुटुंब पोटासाठी जीवाचा आटापिटा करीत असते.
चौकट...
शिक्षण नाही...
शिक्षण काय असते माहीत नाही, कधी शाळेची पायरी चढली नाही. जन्माला आल्यानंतर पोटासाठी झगडणार्‍या आई-वडिलांनी केवळ पोटासाठी पैसे मिळवण्याचे शिक्षण दिले. ते करीत असलेल्या सर्कशीमधील कलाच आपले पोट भरू शकते याची खात्री या तरूणाला झाली आहे़

Web Title: Action for the stomach ... Painting Art: The struggle for livelihood of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.