शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कायदा रोमँटिक संबंधांना गुन्हा ठरवण्यासाठी नव्हता, पोक्सो शोषणाचे साधन : हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 06:00 IST

Court News: पोक्सो कायदा हा किशोरवयीनांच्या सहमतीपूर्ण प्रेमसंबंधांना गुन्हा ठरवण्यासाठी कधीच नव्हता. ते आता शोषणाचे साधन बनले आहे, असे अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले आहे.  

डॉ. खुशालचंद बाहेती अलाहाबाद - पोक्सो कायदा हा किशोरवयीनांच्या सहमतीपूर्ण प्रेमसंबंधांना गुन्हा ठरवण्यासाठी कधीच नव्हता. ते आता शोषणाचे साधन बनले आहे, असे अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले आहे.  

२० वर्षीय प्रकाश कुमार गुप्ता याने १६ मार्च २०२३ रोजी १३ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध ३६३, ३६६ (अपहरण), ३७६ (३) (बलात्कार) आयपीसी आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.  जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर प्रकाश कुमार याने हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला. जामीन देताना प्रेमातून निर्माण झालेल्या सहमतीच्या नात्याची वस्तुस्थिती विचारात घेतली पाहिजे, असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने जामीन मंजूर केला.  यावर्षी २० ऑगस्ट रोजी कोलकाता उच्च न्यायालयाच्या किशोर मुलांमधील गैर-शोषणात्मक  रोमँटिक कृत्यांना पोक्सो कायद्यातून सूट देण्यात यावी, या सूचनेवर सुप्रीम कोर्टाने पोक्सोच्या  गुन्ह्याला रोमँटिक कसे म्हणता येईल? असा प्रश्न उपस्थित केला.

१८ वर्षांखालील मुलांना लैंगिक शोषणापासून वाचवण्यासाठी पोक्सो कायदा तयार करण्यात आला. आजकाल ते शोषणाचे साधन बनले आहे. हा कायदा किशोरवयीन मुलांमधील सहमतीपूर्ण रोमँटिक संबंधांना गुन्हेगार ठरवण्यासाठी कधीच नव्हता.पोक्सो कायद्यासारख्या संरक्षणात्मक कायद्याच्या गैरवापरामुळे लक्षणीय अन्याय कसा होऊ शकतो, याचे हे उदाहरण आहे. -न्यायमूर्ती कृष्ण पहल

टॅग्स :Courtन्यायालयrelationshipरिलेशनशिपPOCSO Actपॉक्सो कायदा