सवार्ेदय उच्च माध्यमिकचे क्रीडा स्पर्धेत यश
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:17+5:302015-02-14T23:52:17+5:30
उसगाव : येथील सवार्ेदय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी राज्य पातळीवरील टेनिकॉईट खो-खो आणि कबड्डी स्पर्धेत यश संपादन केले. ही स्पर्धा क्रीडा खात्याने आयोजित केली होती.

सवार्ेदय उच्च माध्यमिकचे क्रीडा स्पर्धेत यश
उ गाव : येथील सवार्ेदय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी राज्य पातळीवरील टेनिकॉईट खो-खो आणि कबड्डी स्पर्धेत यश संपादन केले. ही स्पर्धा क्रीडा खात्याने आयोजित केली होती.खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात द्वितीय क्रमांक, तर मुलींच्या गटात तृतीय क्रमांक पटकावला. कबड्डी स्पर्धेत मुलांच्या व मुलींच्या गटात तृतीय क्रमांक पटकावला. टेनिकॉईट स्पर्धेत राज्य पातळीवर द्वितीय स्थान मिळविले. त्यात उन्नती मेलेकर, उष्मा मेलेकर, सोनिया बोर्डेकर, कृपा नाईक व सोनल नाईक या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. उच्च माध्यमिक क्रीडा शिक्षिका सुषमा गोब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी चिकाटीने लढती दिल्या. या यशाबद्दल प्राचार्य माधव कर्नाटकी तसेच संस्थेचे अध्यक्ष तुषार उसगावकर, पालक-शिक्षक संघाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले.ढँङ्म३ङ्म : 14-स्रङ्मल्ल-08 कॅप्शन - सवार्ेदय उच्च माध्यमिकचा टेनिकॉईटचा उपविजेता संघ. सोबत प्राचार्य माधव कर्नाटकी व सुषमा गोब्रे. विजेते विद्यार्थी उन्नती मेलेकर, उष्मा मेलेकर, सोनिया बोर्डेकर, कृपा नाईक व सोनल नाईक.