आचार्य सत्येंद्र दास यांना शरयू नदीत 'जल समाधी', संतांवर अंत्यसंस्कार का होत नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 19:40 IST2025-02-13T19:40:42+5:302025-02-13T19:40:52+5:30

Ayodhya Priest Satyendra Das : श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे बुधवारी वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले.

Acharya Satyendra Das was cremated in the Sharrayu river, why are saints not cremated? Let's find out... | आचार्य सत्येंद्र दास यांना शरयू नदीत 'जल समाधी', संतांवर अंत्यसंस्कार का होत नाहीत?

आचार्य सत्येंद्र दास यांना शरयू नदीत 'जल समाधी', संतांवर अंत्यसंस्कार का होत नाहीत?

Ayodhya Priest Satyendra Das : अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे बुधवारी निधन झाले. गुरुवारी सायंकाळी महंत सत्येंद्र दास यांना शरयू नदीच्या तुळशीदास घाटावर जलसमाधी देण्यात आली. यापूर्वी त्यांचे पार्थिव रथावर बसवून शहरभर फिरवण्यात आले. दरम्यान, संतांना जलसमाधी का दिली जाते, त्यांच्यावर अंत्यसंस्कार का केले जात नाहीत? असे प्रश्न अनेकांना पडले असतील.

जलसमाधी म्हणजे काय?
सनातन धर्मात अंतिम संस्कारासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. यापैकी एक म्हणजे संताचे पार्थिव अंत्यविधी न करता नदीत फेकले जाते. याला जलसमाधी म्हणतात. जलसमाधी देताना मृतदेहाला जड दगड बांधले जातात. त्यानंतर मृतदेह नदीत सोडला जातो. याशिवाय संतांना भू-समाधीही दिली जाते. यामध्ये मृत शरीराला पद्मासन किंवा सिद्धीसनाच्या मुद्रेत बसवून जमिनीत गाडले जाते.

जलसमाधी का दिली जाते?
भारतीय संस्कृती आणि सनातन धर्मात प्राचीन काळापासून संतांना जलसमाधी देण्याची परंपरा आहे. पाणी हे पवित्र तत्व असून त्यात समाधी केल्याने मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. असे मानले जाते की मानवी शरीर पृथ्वी, पाणी, अग्नि, वायू आणि आकाश या पाच घटकांनी बनलेले आहे. संतांचे मृतदेह पाण्यात विसर्जित केले जातात जेणेकरून ते त्याच्या मूळ घटकाकडे परत येतील. 

आचार्य सत्येंद्र दास कोण होते?
सत्येंद्र दास हे अयोध्याराम मंदिराचे मुख्य पुजारी होते. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला. निर्वाणी आखाड्यातून आलेल्या अयोध्येतील प्रमुख संतांपैकी ते एक होते. 3 फेब्रुवारीला त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर त्यांना संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGI) मध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

Web Title: Acharya Satyendra Das was cremated in the Sharrayu river, why are saints not cremated? Let's find out...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.