शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 18:48 IST

आरोपीला २९ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता, तरीही त्याला सुमारे एक महिन्यानंतर, म्हणजेच २४ जून रोजी गाझियाबाद जिल्हा कारागृहातून सोडण्यात आले.

एका आरोपीला जामीन मंजूर झाल्यानंतरही वेळेत न सोडल्याने आता उत्तर प्रदेश सरकारला मोठी नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. हे प्रकरण राज्याच्या धर्मांतर विरोधी कायद्याशी संबंधित आहे. या प्रकरणात, आरोपीला २९ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता, तरीही त्याला सुमारे एक महिन्यानंतर, म्हणजेच २४ जून रोजी गाझियाबाद जिल्हा कारागृहातून सोडण्यात आले.

सुप्रीम कोर्टाकडून यूपी सरकारला फटकार!सुटकेस उशीर झाल्याने, सर्वोच्च न्यायालयाने २५ जून रोजी उत्तर प्रदेश सरकारला कडक शब्दांत फटकारले होते. आरोपीला ५ लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले होते आणि राज्य सरकारकडून या आदेशाच्या पालनाबाबतचा अहवाल मागवला होता. शुक्रवारी न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाला राज्य सरकारच्या वकिलांनी सांगितले की, भरपाईची रक्कम देण्यात आली आहे. आरोपीच्या वकिलानेही याची पुष्टी केली.

२८ दिवसांच्या विलंबावर कोर्टाची गंभीर टिप्पणीखरं तर, जामीन मिळाल्यानंतर गाझियाबादच्या कनिष्ठ न्यायालयाने २७ मे रोजी आरोपीला सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याच्या सुटकेला २८ दिवसांचा विलंब झाला. यावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र टिप्पणी करत म्हटले की, 'व्यक्तीचे स्वातंत्र्य संविधानानुसार एक अत्यंत महत्त्वाचा अधिकार आहे.' कोर्टाने हे देखील म्हटले की, 'एका किरकोळ तांत्रिक कारणामुळे एखाद्याचे स्वातंत्र्य हिरावले जाणे ही गंभीर चिंतेची बाब आहे.'

विलंबामुळे चौकशीचे आदेशसर्वोच्च न्यायालयाने गाझियाबादच्या प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशात 'उत्तर प्रदेश बेकायदेशीर धर्मांतरण प्रतिबंध अधिनियम, २०२१' च्या कलम ५(१)चा स्पष्ट उल्लेख नव्हता. याच कारणामुळे कारागृह अधिकाऱ्यांनी २८ मे रोजी आदेशात सुधारणा करण्यासाठी याचिका दाखल केली होती, जी वेळेत निकाली काढता आली नाही. यामुळेच सुटकेस उशीर झाल्याचे सरकारने म्हटले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेश