पॅरीसमधील हल्लेखोरांना बक्षीस जाहीर करणा-यांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: January 9, 2015 18:20 IST2015-01-09T16:46:04+5:302015-01-09T18:20:07+5:30
पैगंबरांची थट्टा उडवणा-यांना ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करणा-या बसपा नेते याकुब कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पॅरीसमधील हल्लेखोरांना बक्षीस जाहीर करणा-यांवर गुन्हा दाखल
>ऑनलाइन लोकमत
इलाहबाद, ( उत्तर प्रदेश), दि. ९ - पैगंबरांची थट्टा उडवणा-यांना ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करणा-या बसपा नेते याकुब कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याकुब कुरेशी यांनी फ्रान्समधील चार्ली हेब्डो या मासिकावर हल्ला करणा-या दहशतवाद्यांनाही ५१ कोटीचे बक्षीस जाहीर कल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून मिरत येथील वरीष्ठ पोलिस निरीक्षक ओंकार सिंग यांनी भारतीय दंड संहितेतील कलम ५०५ अंतर्गत कुरेशींवर गुन्हा दाखल केला असल्याचे समजते. त्याचप्रमाणे या आधीही कुरेशी यांनी पैगंबरांचे व्यंगचित्र काढणा-या डॅनीश व्यंगचित्रकाराला मारणा-या बाबत इतक्याच रकमेचे बक्षीस जाहीर केले होते.
याबाबत कुरेशी यांना विचारले असता त्यांनी आपण असे कोणतेही वक्तव्ये केले नसल्याचे म्हटले आहे. याबाबत बसपा नेते अतार सिंग राव यांना वितारले असता त्यांनी या प्रकरणाबाबत आपल्याला माहिती नाही, कुरेशी यांच्यासोबत बोलून मी माझे मत व्यक्त करेन असे म्हणत त्यांनी प्रतिक्रीया देण्याचे टाळले.