शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Dhirendra Shastri : बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी स्वीकारलं 30 लाखांचं आव्हान! म्हणाले- दरबारात या मग पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 17:21 IST

धीरेंद्र शास्त्री म्हणाले, आरोप करणारे लोक संकुचित मानसिकतेचे आहेत. आम्ही केवळ 7 दिवसांचीच कथा करतो. आम्ही आपली समस्या सोडवू, असा दावा कधीही करत नाही.

बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत नागपूरमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा नागपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर याप्रकरणी पोलिसांनी कारवाई न केल्यास आपण न्यायालयात जाऊ, असेही समितीचे श्याम मानव यांनी म्हटले आहे. यानंतर आता धीरेंद्र शास्त्री यांनीही पलटवार करत, 'मी आपले आव्हान स्वीकारतो. श्याम यांनी येथे रायपूरला यावे, तिकिटाचे पैसे मी देईन. आम्ही दिव्य दरबार लावला होतो, तेव्हा श्याम का आले नाही? ते आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटले आहे.

धीरेंद्र शास्त्री म्हणाले, आरोप करणारे लोक संकुचित मानसिकतेचे आहेत. आम्ही केवळ 7 दिवसांचीच कथा करतो. आम्ही आपली समस्या सोडवू, असा दावा कधीही करत नाही. जे आमचे इष्ट आहेत, त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही अंधश्रद्धेच्या बाजूने नाही. आमचे इष्टच लोकांची समस्या दूर करतात. हनुमानजींची पूजा करणे आणि प्रचार करणे चुकीचे आहे का?

नागपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आरोप केला होता की, धिरेंद्र शास्त्री यांनी चमत्काराचे दावे करत कायद्याचे उल्लंघन केले आहे. यावर बोलताना धिरेंद्र शास्त्री म्हणाले, हे सर्व धर्मविरोधी लोक आहेत. एवढेच नाही, तर 'हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार,' असेही ते म्हणाले. तसेच आम्ही अनेक वर्षांपासून म्हणत आलो आहोत की, आम्ही चमत्कार करत नाही आणि गुरुही नाही, अशेही त्यांनी म्हटले आहे.

शास्त्रींनी स्वीकारले 30 लाख रुपयांचे आव्हान - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना आव्हान देत, चमत्कार दाखवा, खरे ठरले तर आणि त्यांना 30 लाख रुपये देऊ. पण ते आव्हान स्वीकारण्यापूर्वीच 2 दिवस आधीच कथा संपवून निघून गेले. मात्र, धीरेंद्र शास्त्री यांनी श्याम मानव यांचे आव्हान स्वीकारले आहे. याच बरोबर, धीरेंद्र कृष्ण यांना अटक करण्यात यावी अशी मागणीही समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :shyam manavश्याम मानवPoliceपोलिसnagpurनागपूर