शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

भाजपाची बी टीम असल्याचा आरोप, काँग्रेसने या मित्रपक्षाला यूपीएमधून हाकलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 17:28 IST

Congress News: काँग्रेस पक्षाने आसाममधील आपला सहकारी पक्ष ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF) या पक्षाला यूपीएमधून हाकलले आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाने आसाममधील आपला सहकारी पक्ष ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF) या पक्षाला यूपीएमधून हाकलले आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी याची घोषणा केली आहे. त्यांनी आसाममधील एआययूडीएफ हा पक्ष भाजपाची बी टीम असल्याचा आरोप केला. एआययूडीएफचे अध्यक्ष बदरुद्दीज अजमल यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत साटेलोटे केले होते, असा दावा जयराम रमेश यांनी केला. काँग्रेसने बदरुद्दीन अजमल यांच्या कथित विधानावरून त्यांच्यावर जोरदार पटलवार केला. तसेच त्यांचा पक्ष हा असदुद्दीन ओवैसींच्या एआयएमआयएम प्रमाणेच भाजपाचं मुखपत्र आहे, असा टोला लगावला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, अजमल कुठलाही दावा करो. मात्र आता त्यांचं संयुक्त पुरोगामी आघाडीशी(यूपीए) काहीही देणंघेणं नाही आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांनुसार अजमल यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केला होता. आसाममधील काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांच्याकडून रात्रीच्या वेळी पाकीट घेतात, असा आरोप अजमल यांनी केला होता. त्यानंतर जयराम रमेश यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले की, खासदार बदरुद्दीन अजमल यांनी आसाममध्ये काँग्रेस नेतृत्वाविरोधात संपूर्णपणे अस्वीकारार्ह आणि संतापजनक विधान केले आहे. हे विधान अत्यंत अपमानास्पद आहे.

जयराम रमेश पुढे म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि एआययूडीएफ हे पक्ष एकत्र आघाडी करून लढले होते. ही आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेससाठी सोपा नव्हता. मात्र अजमल हे विश्वासपात्र सहकारी ठरतील आणि देशात धर्मनिरपेक्ष शक्तींना बळकट करतील, असे काँग्रेसला वाटले होते.

अजमल यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने काम केले होते आणि काँग्रेस आणि काँग्रेस नेतृत्वाला बदनाम करण्याच्या हेतूने ही आघाडी केली होती, असा आरोपही जयराम रमेश यांनी केला.   

टॅग्स :congressकाँग्रेसAll India United Democratic Frontआॅल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटAssamआसाम