फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड
By admin | Updated: August 13, 2015 22:34 IST
फसवणुकीच्या गुन्ह्यातील
फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड
फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआडपुणे : तब्बल 3 कोटी 30 लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने (दक्षिण) गजाआड केले. ही कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली. केशव गणेश फाटक (रा. अथर्व रेसीडेन्सी, पौड रस्ता, कोथरुड) असे आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी महेश निंबाळकर यांना खब-याने आरोपीची माहिती दिली होती. आरोपी त्याच्या घरी आल्याची माहिती मिळताच निंबाळकर, राज देशमुख, जोरकर आणि राजकुमार पाटील यांनी आरोपीला त्याच्या घरामधून ताब्यात घेतले. फाटक रुग्णालयामधील शस्त्रक्रियांसाठी लागणारी यंत्र बसवण्याचे काम करीत होता. त्यासाठी त्याने जनसेवा बॅंकेकडून 3 कोटी 30 लाखांचे कर्ज घेतलेले होते. या रकमेचा त्याने अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्याला पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.---