शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक रोख्यांवरून राहुल गांधींचे घणाघाती आरोप; अमित शाह यांनी जाहीर केली निधीची आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 22:22 IST

राजकीय निधीबाबत पारदर्शकता येण्यासाठी निवडणूक रोखे ही योजना आणण्यात आली होती, असा दावा अमित शाह यांनी केला आहे.

Amit Shah On Rahul Gandhi ( Marathi News ) : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांचे तपशील आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध करताच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर घणाघाती आरोप केले. या खंडणी रॅकेटच्या माध्यमातून भाजप पैसे गोळा करत असल्याचं ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या या आरोपांना आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच राजकीय निधीबाबत पारदर्शकता येण्यासाठी निवडणूक रोखे ही योजना आणण्यात आली होती. आता राजकारणात पुन्हा काळा पैसा येण्याचा धोका आहे, असंही अमित शाह म्हणाले.

राहुल गांधींवर पलटवार करताना अमित शाह यांनी म्हटलं आहे की, "कॅशच्या माध्यमातून जो निधी राजकीय पक्षांना मिळत होता, त्यामध्ये आजपर्यंत कोणाचं नाव जाहीर झालंय का? कोणाचंच नाही झालं. मात्र जे राजकीय आरोप आहेत, त्यांना मला सविस्तर उत्तर द्यायचं आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला खूप मोठा फायदा झाला आहे, कारण भाजप सत्तेत आहे, असा अजेंडा चालवला जात आहे. निवडणूक रोखे हे जगातील सगळ्यातं मोठं खंडणी रॅकेट असल्याचं वक्तव्य आज राहुल गांधी यांनी केलं आहे. त्यांना कोण असं लिहून देतं, माहीत नाही. मी देशाच्या जनेतसमोर आज चित्र स्पष्ट करू इच्छितो. भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून ६ हजार कोटींचा निधी मिळाला आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळालेल्या एकूण निधीचा आकडा २० हजार कोटी रुपये इतका आहे. मग उरलेले १४ हजार कोटी रुपये कुठे गेले? तृणमूल काँग्रेसला १६०० कोटी रुपये मिळाले, काँग्रेसला १४०० कोटी रुपये मिळाले आहेत," असा दावा अमित शाह यांनी केला आहे. ते  इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते.

काय आहे राहुल गांधींचा आरोप?

भाजपवर घणाघाती आरोप करताना आज भिवंडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, "मोठ्या कंपन्यांकडून पैसे उकळण्याचे हे एक साधन आहे. ही योजना म्हणजे जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट. ईडी-सीबीआय तपास करत नाहीत, ते भाजपसाठी वसुली करतात. या पैशांचा वापर देशातील पक्ष फोडण्यासाठी होतो. भारताच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात आहे," असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला आहे.

दरम्यान, "सुप्रीम कोर्टाने सांगितलं की, नरेंद्र मोदींनी लॉन्च केलेल्या निवडणूक रोख्यांचा तपशील सार्वजनिक करावा. त्यानंतर देशातील बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनी भाजपला हजारो कोटी रुपये दिल्याची आकडेवारी समोर आली. हे देशविरोधी कृत्य आहे. यापेक्षा मोठे देशविरोधी कृत्य असू शकत नाही. भाजप सरकार ईडी, सीबीआय, आयटीवर दबाव टाकून कंपन्यांकडून पैसे उकळते. ज्या कंपन्यांवर तपास यंत्रणांनी कारवाई केली जाते, त्या कंपन्या भाजपला देणगी देतात. संपूर्ण देशाची व्यवस्था भ्रष्टाचारात ढकलण्यासारखे आहे. ही पंतप्रधान मोदींची आयडिया आहे. हे नितीन गडकरींनी नाही, तर पंतप्रधान मोदींनी केलं आहे," अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सरकारचा समाचार घेतला आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग