शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Yogi Adityanath Oath Ceremony : योगींनी शपथविधीसाठी 25 मार्च हाच दिवस का निवडला?; जाणून घ्या, 'या' मागचं खास कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 12:00 IST

Yogi Adityanath Oath Ceremony : योगी आदित्यनाथ हे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली आहे. योगी आदित्यनाथ हे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे नेते, उद्योगपती, संत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याच दरम्यान शपथविधीसाठी आजचाच दिवस का निवडला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ज्योतिषांच्या मते, शपथविधीसाठी 25 मार्च ही तारीख निवडण्यामागे एक खास कारण आहे. 14 मार्चपासून सूर्य ग्रह मीन राशीत असल्याने खरमास सुरू आहे. हा खरमास 14 एप्रिलपर्यंत राहील. 

खरमासमध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यास मनाई आहे. यादरम्यान घराचं बांधकाम, विवाह असे कोणतेही संस्कार कार्य करत नाही अशी मान्यता आहे. पण या सर्व प्रतिकूल योगांमध्ये एक शुभ योगही तयार होत आहे. 24 मार्च रोजी बुध मीन राशीत आल्याने बुधादित्य योग तयार झाला आहे. याला ज्योतिषशास्त्रात राजयोग म्हणून संबोधलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार बुध आणि सूर्याचा संयोग बुद्धिमत्ता आणि कौशल्याने सत्ता चालवण्याचे शक्ति प्रदान करतो. खरमास असूनही हा योग शुभ मानला गेला आहे. तर होळीपूर्वी शपथ न घेण्यामागे होलाष्टक असण्याचे कारण सांगण्यात आलं होतं.

"हा काळ योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यातील सर्वात सुवर्ण काळ"

नक्षत्राबद्दल बोलायचे झाले तर, 25 तारखेला नक्षत्र खूप चांगले आहे आणि या दिवशी स्थिर योग तयार होत आहे. ज्या दरम्यान केलेले कोणतेही काम स्थिर असते, अशी मान्यता आहे. या दिवशी मूळ नक्षत्र अष्टमी तिथी आहे ज्याला शीतला अष्टमी असेही म्हणतात. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, अशा वेळी जे काम हाती घेतलं जातं, त्यात कोणताही अडथळा येत नाही, त्यामुळे 25 तारखेला योगी आदित्यनाथ आपल्या मंत्रिमंडळासह शपथ घेणार आहेत. 2024 मध्ये केतूच्या महादशानंतर शुक्राची महादशा सुरू होणार आहे. हा काळ योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यातील सर्वात सुवर्ण काळ असेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"नरेंद्र मोदींची इच्छा असेल तर योगी एक दिवस पंतप्रधान होऊ शकतात, हे फक्त त्यांच्याच हातात"

योगींच्या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. शपथविधीच्या आधी योगी आदित्यनाथांच्या बहिणीने इच्छा व्यक्त केली आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा असेल तर योगी एक दिवस पंतप्रधान होऊ शकतात" असं योगींच्या बहिणीने म्हटलं आहे. तसेच योगींच्या मेहुण्याने त्यांचा एक किस्सा देखील सांगितला आहे. योगी आदित्यनाथ यांची बहीण आणि त्यांचे मेहुणे योगींच्या शपथविधीच्या विषयावर 'टाइम्स नाऊ नवभारत' वाहिनीशी बोलत होते. याच दरम्यान पत्रकाराने त्यांची बहीण शशी सिंह यांना योगी आदित्यनाथ यांच्या पुढच्या वाटचालीसंदर्भात प्रश्न केला, तेव्हा त्यांनी सांगितले की, आता ते मुख्यमंत्री झाले आहेत आणि नरेंद्र मोदींची इच्छा असेल तर तेही पंतप्रधान होऊ शकतात. हे सर्व फक्त मोदींच्या हातात आहे, असंही म्हटलं आहे.

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२BJPभाजपाPoliticsराजकारण