मुंबई-पुणे महामार्गावर अपघात; एसटीतील दहा प्रवासी जखमी
By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:10+5:302015-04-13T23:53:10+5:30
लोणावळा : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा गावातील हनुमान मंदिराजवळ कुर्ला येथून भीमाशंकरकडे जाणार्या एसटीचालकाचा ताबा सुटल्याने बस द्रुतगती महामार्गाच्या खांबाला धडकली. या अपघातात दहा जण जखमी झाले आहेत़

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात; एसटीतील दहा प्रवासी जखमी
ल णावळा : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा गावातील हनुमान मंदिराजवळ कुर्ला येथून भीमाशंकरकडे जाणार्या एसटीचालकाचा ताबा सुटल्याने बस द्रुतगती महामार्गाच्या खांबाला धडकली. या अपघातात दहा जण जखमी झाले आहेत़ प्रत्यक्षदर्शी व गाडीमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला-नेहरुनगर आगाराची भरधाव एसटी (एमएच २० बीएल २४६५) भीमाशंकरकडे जात असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला. यामुळे बस द्रुतगती महामार्गाच्या खांबाला धडकली़ एकमेकांच्या अंगावर पडल्याने, तसेच आसनांमध्ये पाय अडकल्याने दहा जण जखमी झाले़ शारदा दिनकर जाधव (वय ५५, रा़ मालाड, मुंबई), कांताराम किसन गवारी (वय ५०, रा़ वर्तकनगर, ठाणे), अरविंद बळीराम देशमुख (वय ४५, रा़ शेनगाव, खालापूर), वेणू दिगंबर मिल्खे (वय ४९), मेघा दिगंबर मिल्खे (वय २८, दोघेही रा. घाटकोपर), बदाम बाबूराव आवटे (वय ५६, रा़ मंंचर, ता.आंबेगाव, जि.पुणे), अंजनाबाई किसन हगवणे (वय ७०, रा़ गिटवडीची रामवाडी, ता.आंबेगाव), आशा रामदास कदम (वय ३०) व रामदास बन्सी कदम (वय ४२, दोघेही रा़ सायन, मुंबई), अफ झल ग्यासुद्दीन अन्सारी (वय २१, मूळ उत्तर प्रदेश) हे जखमी झाले आहेत़ येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ घटनेची माहिती मिळताच खंडाळा महामार्ग व लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी येत जखमींना रुग्णालयात पाठवून देत वाहतूक सुरळीत केली़----------------