शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रील बनवण्याच्या नादात गेला चार जणांचा जीव, १३० च्या वेगाने सुसाट पळवली कार, अखेर...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 17:10 IST

Accident in Rajasthan: जैसलमेरच्या सांगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत देविकोट येथे झालेल्या एका भीषण अपघातामध्ये आई आणि मुलासह चार जणांचा मृत्यू झाला.

जैसलमेरच्या सांगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत देविकोट येथे झालेल्या एका भीषण अपघातामध्ये आई आणि मुलासह चार जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार कारमधून प्रवास करत असलेले तरुण मद्याचे ग्लास हातात घेऊन गाण्यावर नाचत सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी रिल्स बनवत होते. त्याचवेळी हा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या पिक अप ट्रकमधून डाळिंब खरेदी करत असलेले आई आणि मुलगा मृत्युमुखी पडला. तर उपचारादरम्यान कारमधील दोघा तरुणांचाही मृत्यू झाला. 

पोलीस अधीक्षक विकास सांगवान यांनी सांगितले की, हा अपघात शुक्रवारी रात्री सुमारे ८.३० च्या सुमारास घडला. अपघातावेळी कारचा वेळ सुमारे १३० किमी प्रति तास एवढा होता. या दरम्यान, देवीकोटच्या मुख्य रस्त्यावर या भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका पिकअपला धडक दिली. त्यात तिथे डाळिंब करत असलेल्या आई आणि मुलग्याचा मृत्यू झाला. पिकअपला धडकल्यानंतर कार सुमाारे २० फूट घसरत जाऊन थांबली.

कारच्या धडकेत मृत्युमुखी पडलेले मायलेक हे नेपाळमधील आहेत. मेनकल आणि मनीष अशी या मायलेकांची नावं आहेत. या अपघातामध्ये कारमधून प्रवास करत असलेले तरुणही गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना आणि मृतांना जैसलमेर जवाहिर रुग्णालयामध्ये आणण्यात आले. तिथे कारमधून प्रवास करत असलेल्या रोशन खाँ आणि भवानी सिंह या तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघाताची शिकार झालेली मेनकला आणि तिचा पती भीमबहादूर हे तीन वर्षांपूर्वीच देविकोट येथे राहण्यास आली होती. दरम्यान, या अपघातात पिकअपमध्ये बसलेल्या दोन अल्पवयीन मुलांनाही  दुखापत झाली आहे. मात्र सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. कारमधून प्रवास करत असलेले राजू सिंह सिसोदिय आणि लीलू सिंह चौहान यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात होण्यापूर्वी काही वेळ आधी या तरुणांनी मद्यपान केले होते. तसेच त्याचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.  

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थान