हवाईदलाच्या जग्वार विमानाला अपघात
By Admin | Updated: March 5, 2015 23:55 IST2015-03-05T23:55:57+5:302015-03-05T23:55:57+5:30
हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्णात शाहबादनजीक हवाई दलाच्या जग्वार विमानाला गुरुवारी अपघात झाला़ सुदैवाने विमानाचा वैमानिक सुरक्षित बचावला़

हवाईदलाच्या जग्वार विमानाला अपघात
चंदीगड : हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्णात शाहबादनजीक हवाई दलाच्या जग्वार विमानाला गुरुवारी अपघात झाला़ सुदैवाने विमानाचा वैमानिक सुरक्षित बचावला़
कुरुक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सिमरदीपसिंह यांनी सांगितले की, येथून सुमारे ६५ किमी दूर शाहबादनजीक लांडी गावातील एका शेतात हे लढाऊ विमान कोसळले़ सव्वाच्या सुमारास हा अपघात झाला़ कोसळण्यापूर्वीच वैमानिकाने त्यातून उडी घेतली़ यात त्याला किरकोळ दुखापत झाली़
भारतीय हवाईदलाच्या विमानांचे अपघात
सुखोई-३० १ १ - १
मिराज-२००० २ - - -
जग्वॉर १ १ १ २
मिग-२९ १ - २ -
मिग-२७ - १ - १
मिग-२१ ४ १ २ १
सी-१३० जे - - १ -
ए एन-३२ - - - १
हॉक १ - - -
किरण २ - - -
एम आई-१७*- २ - -
ए एल एच १ - - १
एकूण १३ ६ ६ ७