'अभाविप'चा दिल्ली विद्यापीठाबाहेरील मोर्चा सुरू

By Admin | Updated: March 2, 2017 13:40 IST2017-03-02T13:38:41+5:302017-03-02T13:40:23+5:30

दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मोर्चा काढला आहे.

'ABVP' launches outside of Delhi University | 'अभाविप'चा दिल्ली विद्यापीठाबाहेरील मोर्चा सुरू

'अभाविप'चा दिल्ली विद्यापीठाबाहेरील मोर्चा सुरू

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - दिल्ली युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी गुरमेहर कौरच्या पोस्टवरून सुरू असलेला वाद आणि दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मोर्चा काढला आहे. या मोर्चात सेकडो विद्यार्थी सहभागी झाले असून नॉर्थ कॅम्पसबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
दरम्यान कॅम्पस परिसरात झालेल्या हिंसाचारात तसंच राजकीय नेते आणि सेलिब्रेटींच्या शाब्दिक चकमकीत सहभागी झालेल्या दोन सदस्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निलंबित केलं होतं. अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या समर्थकांवर हल्ला केल्याप्रकरणी यांना अटक करण्यात आली होती. बेशिस्तपणाचा ठप्पा ठेवत त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली

Web Title: 'ABVP' launches outside of Delhi University