दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघावर ‘अभाविप’चा ङोंडा
By Admin | Updated: September 14, 2014 02:14 IST2014-09-14T02:14:46+5:302014-09-14T02:14:46+5:30
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या (डुसू) निवडणुकीत तब्बल 18 वर्षानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला आपला ङोंडा फडकावण्यात यश आले आहे.

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघावर ‘अभाविप’चा ङोंडा
नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या (डुसू) निवडणुकीत तब्बल 18 वर्षानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला आपला ङोंडा फडकावण्यात यश आले आहे. यावर्षी या निवडणुकीतील चारही जागांवर अभाविपचे उमेदवार विजयी झाले असून त्यांनी काँग्रेसच्या विद्यार्थी संघाला पराभूत केले आहे.
गेल्या वर्षीच्या आपल्या कामगिरीत प्रगती करीत अभाविपने विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सहसचिवपदावर
बाजी मारली आहे. अभाविपचे मोहित नागर हे डुसूच्या अध्यक्षपदी, उपाध्यक्षपदी प्रवेश मलिक, सचिवपदी कनिका शेखावत तर सहसचिवपदी आशुतोष माथूर निवडून आले आहेत.
(लोकमत न्यूज नेटवर्क)