फरार आरोपीस अटक
By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:09+5:302015-08-18T21:37:09+5:30
फरार आरोपीस अटक

फरार आरोपीस अटक
फ ार आरोपीस अटक चिमुकलीवर अत्याचार : शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी भिवापूर : तालुक्यातील मालेवाडा येथील चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीस भिवापूर पोलिसांनी नुकतीच अटक केली. नागपूर येथील सत्र न्यायाधीश आर. जे. राठी यांच्या न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत (दि. २१) पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती भिवापूर पोलिसांनी दिली. सचिन रामचंद्र खंडाळ (२२, रा. मालेवाडा, ता. भिवापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २८ जुलै रोजी पाच वर्षीय चिमुकली रस्त्याच्या कडेला खेळत होती. तिची आई शेतात गेली होती. सचिनने तिला खाऊ देण्याचा बहाणा केला आणि तिला घरात घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी तिच्या आईच्या तक्रारीवरून भिवापूर पोलिसांनी आरोपी सचिनविरुद्ध भादंवि ३७६ आय, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तो घटनेच्या दिवसापासून पोलिसांना हुलकावणी देत होता. दरम्यान, त्याने १४ ऑगस्टला नागपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता. तो गावातच दडून असल्याची माहिती मिळताच ठाणेदार मनीष दिवटे यांनी रविवारी (दि. १६) मध्यरात्री सापळा रचून त्याला मालेवाडा येथे अटक केली. भिवापूर पोलिसांनी त्याला नागपूर येथील न्यायाधीश आर. जे. राठी यांच्या न्यायालयासमोर हजर केले होते. राठी यांच्या न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)***