Indian Air Strike on Pakistan: 'मिराज 2000'नेच उतरवला पाकिस्तानचा माज; कारगिलनंतर पुन्हा कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 12:01 IST2019-02-26T11:36:35+5:302019-02-26T12:01:57+5:30
भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादच्या बालकोट भागात 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Indian Air Strike on Pakistan: 'मिराज 2000'नेच उतरवला पाकिस्तानचा माज; कारगिलनंतर पुन्हा कमाल!
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबाद भागात 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
काय आहे ‘मिराज'?
- भारतीय हवाई दलात 'मिराज' लढाऊ विमान आहेत. 1970 साली या विमानांचे डिझाईन तयार करण्यात आले होते. Dassault Aviation या कंपनीने या विमानांची निर्मिती केली आहे.
- हवाई हल्ल्यासाठी या विमानांचा वापर करण्यात येतो. कालांतराने कंपनीने मिराजमध्ये काही बदल करुन त्याला अधिक सक्षम असे मल्टिरोल लढाऊ विमान बनविले.
- ‘मिराज 2000’ लढाऊ विमान औपचारिकपणे 29 जून 1985 मध्ये भारतीय वायुसेनाच्या 7 क्रमांकाच्या स्क्वाड्रॉनमध्ये समाविष्ट करण्यात आले. कारगिल युद्धात मिराज लढाऊ विमानांचा मोठ्याप्रणात वापर करण्यात आला होता.
- ‘मिराज 2000’ विमानाची लाबी 47 फूट आहे. वजन जवळपास 7500 किलो इतके आहे. 2336 किमी प्रतितास स्पीड आहे. तर 125 राउंड गोळ्या प्रती मिनिट फायरिंगची क्षमता आहे.
- तसेच, 68 मिमीची 18 रॉकेट प्रती मिनिट फायरिंगची क्षमता आहे. जमिनीच्या जवळ जाऊन देखील हल्ला आणि अचूक लक्ष अचूक साधण्याची क्षमता या विमानामध्ये आहे.
Sources: Balakot, Chakothi and Muzaffarabad terror launch pads across the LOC completely destroyed in IAF air strikes. JeM control rooms also destroyed pic.twitter.com/cSE0TjVsBS
— ANI (@ANI) February 26, 2019