जिल्हा परिषदेबाबत विधानसभेत ३२ तारांकित प्रश्न सर्वाधिक ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे दहा प्रश्न
By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:56+5:302014-12-22T23:11:56+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत विधानसभेत तब्बल ३२ तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हा परिषदेबाबत विधानसभेत ३२ तारांकित प्रश्न सर्वाधिक ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे दहा प्रश्न
अ मदनगर : जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत विधानसभेत तब्बल ३२ तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विधानसभेच्या अधिवेशन काळात आमदारांकडून प्रश्नोत्तराच्या तासासाठी विविध विषयांसंदर्भात माहिती मागवून त्यावर चर्चा घडविण्यात येते. नगर जिल्हा परिषदेतील १४ विभागातून ३२ तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. यात सर्वाधिक प्रश्न ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे दहा प्रश्न आहेत. जिल्हा परिषदेत होणार्या विकास कामात राहणार्या त्रुटी आणि भ्रष्टाचार झाल्याच्या संशयावरून त्याबाबत विधीमंडळात चर्चा घडविण्यात येते. गेल्या दोन महिन्यांत नगर जिल्ह्यातील विविध भागातील कामकाजाबाबत हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विचारण्यात आलेल्या या प्रश्नांची माहिती जिल्हा परिषदेला विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सादर करावी लागते. .................विभागनिहाय विचारण्यात आलेले प्रश्नमहिला बालकल्याण १, रोजगार हमी योजना ३, प्राथमिक शिक्षण ३, संपूर्ण स्वच्छता कक्ष १, आरोग्य २, समाज कल्याण विभाग ४, सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण ३, सामान्य प्रशासन विभाग २, कृषी १, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग १०, ग्रामपंचायत विभाग २ यांचा समावेश आहे. ..............................