अर्थव्यवस्थेत मंदीतून बाहेर पडण्याची क्षमता -मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 06:12 AM2019-12-21T06:12:10+5:302019-12-21T06:12:47+5:30

चढउतार होतच असतात : देशाला ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवूच

The ability to exit the recession in the economy - narendra Modi | अर्थव्यवस्थेत मंदीतून बाहेर पडण्याची क्षमता -मोदी

अर्थव्यवस्थेत मंदीतून बाहेर पडण्याची क्षमता -मोदी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सध्याच्या आर्थिक मंदीतून बाहेर पडण्याची पूर्ण क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. भारत पुन्हा एकदा उच्च आर्थिक वृद्धी प्राप्त करील, तसेच ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट प्राप्त करणेही शक्य आहे, असेही मोदी यांनी सांगितले.


वाणिज्य व उद्योग क्षेत्रातील संघटना ‘असोचेम’च्या १00 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोदी यांनी हे वक्तव्य केले. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात अर्थव्यवस्था घसरणीला लागली आहे. सलग सहा तिमाहींच्या घसरणीनंतर आर्थिक वृद्धीचा दर सहा वर्षांच्या नीचांकावर येऊन ४.५ टक्के झाला आहे. बेरोजगारीत सातत्याने वाढ होत आहे. त्यावरून मोदी यांच्या सरकारवर सर्व बाजूंनी टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरील वक्तव्य केले.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या स्थितीबाबत जे बोलले जात आहे, त्याबाबत मी कोणालाही दोष देणार नाही. मी टीकेतील चांगले तेवढे घेऊन पुढे जाणे पसंत करतो. यापूर्वीच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संपुआ सरकारच्या काळात आर्थिक वृद्धीदर ३.५ टक्क्यांपर्यंत घसरला होता. किरकोळ महागाईचा दर ९.४ टक्क्यांपर्यंत वाढला होता. घाऊक महागाईचा दरही ५.२ टक्क्यांपर्यंत वर चढला होता. जीडीपीच्या तुलनेत राजकोषीय तूट ५.६ टक्क्यांपर्यंत वर गेली होती. तरीही मी याबाबत अकारण टीका करणार नाही. अर्थव्यवस्थेत असे चढ-उतार होतच असतात. सध्याच्या स्थितीतून बाहेर पडण्यास देशाची अर्थव्यवस्था पूर्णत: समर्थ आहे.


मोदी यांनी म्हटले की, आमचे इरादे मजबूत आहेत. २0२४ पर्यंत भारताला ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट प्राप्त केले जाईल. हे उद्दिष्ट प्राप्त करणे शक्य आहे. उद्योगपतींनी यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी. आपण अधिक संपत्ती व रोजगारनिर्मिती करून अर्थव्यवस्थेला ५ हजार अब्ज डॉलरवर नेण्याच्या कार्यातील आपली भागीदारी निभवावी. बुद्धी, भांडवल आणि श्रम हे तीन घटक एकत्र आले तर ५ हजार अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य सहज साध्य केले जाईल.

सुधारणांची प्रक्रिया सुरूच
सरकारने केलेल्या सुधारणांचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, कंपनी कायद्यातील काही तरतुदी अशा होत्या की, छोट्या-छोट्या चुकांसाठीही उद्योगांना फौजदारी कारवाई सहन करावी लागत होती. आपल्या सरकारने या तरतुदींना फौजदारी श्रेणीतून हटविले. यातील सुधारणांची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. आपल्या काही सूचना असल्यास जरूर सांगा.
आम्ही जनतेचे एजंट : मोदी म्हणाले की, देशासाठी सगळे सहन करावे लागते. आमच्यावर उद्योगपतींचे एजंट असल्याचे आरोप झाले. पण मी आपणास सांगू इच्छितो की, आम्ही उद्योगपतींचे नव्हे, तर १३0 कोटी भारतीयांचे एजंट आहोत.

Web Title: The ability to exit the recession in the economy - narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.