शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अभिषेक बच्चनची राजकारणात एन्ट्री? 2024 मध्ये या पक्षाकडून उतरू शकतो लोकसभेच्या रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 17:40 IST

Loksabha Election : अभिषेक बच्चनचे पिताश्री अमिताभ बच्चन हे प्रयागराजचे खासदार होते. तसेच आई जया बच्चनही सपाच्या राज्यसभा खासदार आहेत.

लखनऊ - लोकसभा निवडणूक 2024 साठी देशातील सर्वच पक्ष कंबरकसून कामाला लागले आहेत. यातच आता बॉलिवुड अभिनेता अभिषेक बच्चन अमिताभ यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात उतरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अभिषेक बच्चनचे पिताश्री अमिताभ बच्चन हे प्रयागराजचे खासदार होते. तसेच आई जया बच्चनही सपाच्या राज्यसभा खासदार आहेत.

अभिषेक बच्चनच्या राजकारणात येण्यासंदर्भात राजकीय वर्तूळात जबरदस्त चर्चा सुरू आहे. अभिषेक उत्तर प्रदेशातून राजकारणात एन्ट्री करू शकतो, असे कयास लावले जात आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, तो प्रयागराज येथून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लोकसभेच्या आखाड्यात उतरू शकतो. मात्र यासंदर्भात अद्याप, ना सपाकडून अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे, ना बच्चन कुटुंबाकडून यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, सपाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबई दौरा केला होता.

अभिषेकच्या निवडणूक लढण्यासंदर्भात सपा -अभिषेक बच्चनच्या प्रयागराज येथून निवडणूक लढण्यासंदर्भात समाजवादी पक्षाचे प्रवक्ते फखरुल हसन चांद म्हणाले, त्यांची आई जया बच्चन या सपाच्या राज्यसभा सदस्य आहेत. त्यांचे कुटुंब समाजवादी आणि समाजवादी विचाराचे आहे. अशा स्थितीत अभिषेक बच्चनच्या निवडणूक लढण्यासंदर्भातील निर्णय पक्षप्रमुख अखिलेश यादव आणि सपा नेतृत्वाला घ्यायचा आहे. पण, अभिषेक बच्चन यांनी निवडणूक लढवली तर चांगलेच होईल. ते निवडणूक चांगल्या प्रकारे लढतील. त्यांचे वडील अमिताभ बच्चन यांनीही निवडणूक लढवली आहे, असेही चांद यांनी म्हटले आहे. 

महत्वाची गोष्ट म्हणजे, सध्या भाजपच्या रीता बहुगुणा जोशी या प्रयागराजच्या खासदार आहेत. रीता या माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन यांच्या कन्या आहेत. हेमवती नंदन यांना अमिताभ बच्चन यांना निवडणुकीत मदतही केली आहे. 

टॅग्स :Abhishek Bacchanअभिषेक बच्चनAmitabh Bachchanअमिताभ बच्चनPoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टी