शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ही माझी शिकार,असं सांगत अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या एफ-16 च्या उडवल्या ठिकऱ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 14:09 IST

भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना हुसकावून लावतान अभिनंदन यांनी दाखवलेल्या शौर्याची अजून एक गाथा समोर आली आहे.

ठळक मुद्देभारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना हुसकावून लावतान अभिनंदन यांनी दाखवलेल्या शौर्याची अजून एक गाथा समोर मिग -21 विमान घेऊन मोहिमेवर निघालेल्या विंग कमांडर अभिनंदन यांनी समोर पाकिस्तानी एफ-16 विमान दिसताच ही माझी शिकार आहे असा संदेश सहकाऱ्यांना दिलाअवघ्या 86 सेकंदात अभिनंदन यांनी एफ-16 विमानाच्या ठिकऱ्या उडवल्या

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी रात्री सुखरूपरीत्या मायभूमीत परतले आहेत. दरम्यान, भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना हुसकावून लावतान अभिनंदन यांनी दाखवलेल्या शौर्याची अजून एक गाथा समोर आली आहे. मिग -21 विमान घेऊन मोहिमेवर निघालेल्या विंग कमांडर अभिनंदन यांनी समोर पाकिस्तानी एफ-16 विमान दिसताच ही माझी शिकार आहे असा संदेश सहकाऱ्यांना दिला आणि पुढच्या 86 सेकंदात या विमानाच्या ठिकऱ्या उडवल्या, अशी माहिती आता समोर आली आहे. त्याबाबतची सविस्त हकिकत अशी,  पाकिस्तानच्या अत्याधुनिक एफ-16 विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यावर भारताच्या हवाई दलाची विमाने हवेत झेपावली. बघता बघता नौशेरा विभागातील आकाशात भारत आणि पाकिस्तानच्या विमानांमध्ये चकमक सुरू झाली. कुरघोडी आणि हुलकावण्यांचे खेळ सुरू झाले. याला हवाई युद्धाच्या भाषेत डॉग फाइट म्हटले जाते. मिग-21 विमान उडवत असलेल्या अभिनंदन वर्धमान यांनी 15 हजार फूट उंचीवर असताना पाकिस्तानचे एफ-16 विमान पाहिले. ते विमान तेव्हा 8 हजार फूट उंचीवर होते. एकमेकांना झुकांड्या देण्याचा खेळ 26 हजार फूट उंचीपर्यंत पोहोचला. त्याचवेळी विंग कमांडर अभिनंदन यांनी एफ -16 विमानावर आर-73 क्षेपणास्त्र डागले. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या एफ-16 विमानाच्या वैमानिकाने उच्च क्षमतेचा फायदा घेत मिग-21 विमानावर प्रतिवार केला. या चकमकीत दोन्ही विमाने कोसळली.सुदैवाने अभिनंदन वर्धमान हे प्रसंगावधान राखून विमानातून बाहेर पडले. मात्र हवेच्या झोतामुळे त्यांचे पॅराशूट पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहोचल्याने. ते पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडले. दरम्यान,  विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे तीन दिवसांनंतर पाकिस्तानातून भारतात परतले. सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानने शुक्रवारी रात्री अभिनंदन यांना भारताच्या स्वाधीन केले.  

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानIndiaभारतindian air forceभारतीय हवाई दल