अभिजित : श्री संतराज महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत

By Admin | Updated: July 19, 2015 21:24 IST2015-07-19T21:24:25+5:302015-07-19T21:24:25+5:30

डोर्लेवाडी : गुणवडी, डोर्लेवाडी, झारगडवाडीमध्ये श्री संतराज महाराज पालखीचे टाळ-मृदंगाच्या गजरात ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले.

Abhijit: Welcome in the spirit of Mr. Santraj Maharaj | अभिजित : श्री संतराज महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत

अभिजित : श्री संतराज महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत

र्लेवाडी : गुणवडी, डोर्लेवाडी, झारगडवाडीमध्ये श्री संतराज महाराज पालखीचे टाळ-मृदंगाच्या गजरात ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले.
बारामतीमध्ये शनिवारी मुक्कामी असलेली श्री संतराज महाराज यांची पालखी रविवारी (दि. १९) सकाळी सात वाजता प्रस्थान करून झारगडवाडी येथे अकरा वाजता विसावा घेण्यासाठी थांबली होती. तीनही गावांतील ग्रामस्थांनी पालखीचे जंगी स्वागत केले. अनेक ठिकाणी वारकर्‍यांसाठी चहा, बिस्किट, पोहे, जेवणाची व्यवस्था केली होती.
डोर्लेवाडीतील मुस्लिम बांधवांनी आलेल्या वारकर्‍यांना शिरखुर्मा वाटप करून एकतेचा संदेश दिला. श्री संतराज महाराज यांच्या पालखीचे झारगडवाडी अश्व रिंगण मोठ्या उत्साहात पार पडले. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी झारगडवाडी व डोर्लेवाडी येथील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Abhijit: Welcome in the spirit of Mr. Santraj Maharaj