अभिजित : ... तर तहसील कार्यालयावर विद्यार्थ्यांचा अर्धनग्न मोर्चा

By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:36+5:302015-08-19T22:27:36+5:30

इंदापूर : आश्रमशाळेतील दलित, भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहाराच्या अनुदान व इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी इंदापूर तहसील कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्याचा इशारा मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

Abhijit: ... the students of the half-naked front at the tehsil office | अभिजित : ... तर तहसील कार्यालयावर विद्यार्थ्यांचा अर्धनग्न मोर्चा

अभिजित : ... तर तहसील कार्यालयावर विद्यार्थ्यांचा अर्धनग्न मोर्चा

दापूर : आश्रमशाळेतील दलित, भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहाराच्या अनुदान व इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी इंदापूर तहसील कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्याचा इशारा मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
आश्रमशाळांमध्ये शिकणार्‍या भटके विमुक्त जाती-जमाती, मागास, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहार, कर्मचारी वर्गाच्या प्रश्नांची शासनाने परवड केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे २१ एप्रिल २०१५ रोजी पाठवलेल्या पत्राची कसलीही दखल घेतली गेली नाही. उलट जून २०१५मध्ये शालेय षोषण आहाराचे अनुदान ६० टक्क्यांऐवजी २० टक्के देऊन विद्यार्थ्यांची क्रूर चेष्टाच करण्यात आली. हे २० टक्के अनुदानही १४ ऑगस्ट रोजी जमा होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. परिणामी विद्यार्थी अन्न व कपड्यांवाचून वंचित राहिले आहेत.
शासनाकडे पैसे नाहीत, असे सांगितले जाते. सामाजिक न्याय विभागाच्या २६ जून २००८च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी, आश्रमशाळा, मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहांच्या प्रश्नांची सोडवणूक केली जात नाही. मात्र, बगलबच्च्यांच्या कल्याणासाठी मूकबधिर, अपंग, अंध आदींसाठी १०० टक्के अनुदानावर १२३ आश्रमशाळा दिल्या जातात ही फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना आहे. भटके विमुक्त, मागसवर्गीय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहावेत, अशी सत्ताधीशांची धारणा आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
शासनाच्या दुटप्पीपणाच्या निषेधार्थ शिक्षक दिनी विद्यार्थ्यांचा अर्धनग्न मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
०००

Web Title: Abhijit: ... the students of the half-naked front at the tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.