अभिजित : हिवरे बु.च्या सरपंचपदी शीतल साळवे
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:36+5:302015-08-26T23:32:36+5:30
नारायणगाव : हिवरे बु.च्या सरपंचपदी शीतल साळवे, तर उपसरपंचपदी राजेश बेनके यांची बिनविरोध निवड झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माळी यांनी दिली़

अभिजित : हिवरे बु.च्या सरपंचपदी शीतल साळवे
न रायणगाव : हिवरे बु.च्या सरपंचपदी शीतल साळवे, तर उपसरपंचपदी राजेश बेनके यांची बिनविरोध निवड झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माळी यांनी दिली़ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या नूतन ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत सरपंच व उपसरपंच पदाची बिनविरोध निवडणूक घेण्यात आली़ या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी माळी व ढाणे भाऊसाहेब यांनी काम पाहिले़ तसेच महात्मा गांधी तंटामुक्त कमिटीच्या अध्यक्षपदी विलास प्रभाकर बेनके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली़ याप्रसंगी सुमित्रा बेनके, आरती भोर, श्रद्धा भोर, शैला जाधव आदी ग्रामपंचायत सदस्य, गावातील महिला बचत गटाच्या महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़फोटो : ग्रामपंचायत हिवरे बु. ची बिनविरोध निवड झाल्यानंतर सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला़ या वेळी नूतन पदाधिकारी व ग्रामस्थ.