अभिजित कोळपे बातमी : आळेत महिलांची संख्या असणार जास्त
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:28+5:302015-01-23T23:06:28+5:30
१७ सदस्य : ६ प्रभागांसाठी सोडत

अभिजित कोळपे बातमी : आळेत महिलांची संख्या असणार जास्त
१ सदस्य : ६ प्रभागांसाठी सोडतआळेफाटा : आळे (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीची आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत ग्रामसभेत काढण्यात आली. १७ सदस्य असणार्या या ग्रामपंचायतीमध्ये महिला सदस्यांची संख्या मात्र जास्त असेल.आळे येथे ग्रामस्थांची या आरक्षण सोडतीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. महसुली उत्पन्नात अग्रेसर व आळेफाटा या व्यावसायिक ठिकाणाचाही समावेश असणार्या या ग्रामपंचायतीच्या ६ प्रभागांसाठी या वेळी सोडत निघाली. पंचायत समितीचे घोगरे यांच्यासह सरपंच दीपक कुर्हाडे, उपसरपंच उदय पाटील भुजबळ, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, गावकामगार तलाठी या वेळी उपस्थित होते.प्रभागनिहाय सोडत : प्रभाग १ : सर्वसाधारण पुरुष, सर्वसाधारण महिला : प्रत्येकी १ व मागासवर्गीय प्रवर्ग महिला : १.प्रभाग २ : सर्वसाधारण महिला : १, सर्वसाधारण पुरुष : १.प्रभाग ३ : मागासवर्ग प्रवर्ग महिला : १, सर्वसाधारण पुरुष व सर्वसाधारण महिला प्रत्येकी : १.प्रभाग ४ : मागासवर्ग पुरुष : १, अनुसूचित जमाती महिला : १ व सर्वसाधारण पुरुष : १.प्रभाग ५ : अनुसूचित जाती महिला : १, पुरुष मागासवर्ग व महिला मागासवर्ग : प्रत्येकी १.प्रभाग ६ : मागासवर्ग पुरुष : १, सर्वसाधारण पुरुष : १, सर्वसाधारण महिला प्रत्येकी : १.---