अभिजित कोळपे बातमी : अपंग व्यक्तींसाठी मोफत वाहतूक सेवा
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:17+5:302015-02-14T23:50:17+5:30
नारायणगाव ते ससून मार्ग : ऑनलाईन सर्टिफिकेट देणार

अभिजित कोळपे बातमी : अपंग व्यक्तींसाठी मोफत वाहतूक सेवा
न रायणगाव ते ससून मार्ग : ऑनलाईन सर्टिफिकेट देणारनारायणगाव : जुन्नर तालुक्यातील अपंग व्यक्तींसाठी नारायणगाव ते ससून मोफत वाहतूक सेवा सुरू केली आहे. प्रत्येक आठवड्याच्या दर बुधवारी सदर गाडी ससून येथे जाईल व मनसेचे कार्यकर्ते अपंगांना ऑनलाईन सर्टिफिकेट मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे यांनी सांगितले.राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार अपंगांना नवीन संगणकीकृत दाखले काढून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अपंगांना सदर दाखले असल्याशिवाय कोणत्याही सोयी सुविधा मिळत नाहीत़ तसेच, अपंगत्वाचे नवीन दाखले काढण्यासाठी अपंगांची ससेहोलपट होत असल्याने अनेक हेलपाटे मारूनही दाखले मिळत नाहीत़ त्यामुळे मनसेने सदर दाखले काढण्यासाठी पक्षाच्या जुन्नर तालुक्याच्या वतीने मोफत वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे़ बुधवार (दि़ ४) रोजी १५ अपंगांना ऑनलाईन सर्टिफिकेट मोफत मिळवून देण्यात आले़ या वेळी मकरंद पाटे, साईनाथ ढमढेरे, गणेश शेळके, महेंद्र फापाळे, विनोद राजनकर, अमोल शेटे, अभिजित वाघ, चंद्रशेखर तोडकर, संदीप देशमुख, आशा वारुळे, शीला जोरे उपस्थित होते़फोटो ओळ : मनसेच्या वतीने जुन्नर तालुक्यातील अपंग व्यक्तींना ऑनलाईन सर्टिफिकेटचे वाटप करताना मकरंद पाटे, साईनाथ ढमढेरे, गणेश शेळके.