कर्जाच्या व्याज वसुलीसाठी अपहरण
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:27+5:302015-01-23T23:06:27+5:30
नवी मुंबई : व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी व्यापार्याचे अपहरण करून त्याची गाडी चोरल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

कर्जाच्या व्याज वसुलीसाठी अपहरण
न ी मुंबई : व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी व्यापार्याचे अपहरण करून त्याची गाडी चोरल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.गोवंडी येथे राहणार्या मोहमद खान (४२) या व्यापार्यासोबत हा प्रकार घडला आहे. खान हे एपीएमसीमधील कार्यालयात बसलेले असताना राहुल उपाध्याय हा तीन साथीदारांसह तेथे आला. यावेळी त्याने खान यांना मारहाण करत गाडीमधून कोंबून मीरा रोड येथे नेले. त्याकरिता खान यांचीच कार (एमएच ४३ एएस ७८१६) वापरण्यात आली. तेथे एका घरामध्ये खान यांना डांबून ठेवून २८ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. खान यांनी राहुल उपाध्याय याच्याकडून व्याजाने कर्ज घेतले होते. त्यानंतर या कर्जाची परतफेडही केलेली असल्याचे खान यांचे म्हणणे आहे. परंतु व्याजाचे २८ लाख रुपये शिल्लक असल्याचे राहुल याचे म्हणणे होते. त्यानुसार ही रक्कम मिळवण्यासाठी त्याने खान यांचे अपहरण केलेे. मात्र आपल्याकडे पैसे नसल्याचे खान यांनी सांगताच राहुल व त्याच्या सहकार्यांनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर खान यांना मीरा रोड येथे रस्त्यावर सोडून त्यांची एक्स.यू.व्ही. कार चोरून पळवून नेली. त्यानुसार खान यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.(प्रतिनिधी)