शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

आरुषी हत्या प्रकरण - तलवार दाम्पत्याची तुरुंगातून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 17:23 IST

बहुचर्चित आरुषी व हेमराज हत्याकांड प्रकरणातील राजेश व नुपूर तलवार दाम्पत्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - बहुचर्चित आरुषी व हेमराज हत्याकांड प्रकरणातील राजेश व नुपूर तलवार दाम्पत्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. हायकोर्टाच्या निर्णयानंतर सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.  अलाहाबाद उच्च न्यायालयाने या दाम्पत्याची गुरुवारी निर्दोष सुटका केली होती. मात्र, तसे कराताना सीबीआय कोर्टाच्या न्यायाधीशांनी ज्या प्रकारे दाम्पत्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली, त्याबद्दल उच्च न्यायालयाने ताशेरेही ओढले. हे प्रकरण २००८ मधील आहे. अर्थात, आरुषीची हत्या मग केली कोणी? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. या हत्याकांडाला भरपूर प्रसिद्धी मिळाल्याने दाम्पत्याच्या सुटकेविषयीही कमालीची उत्सुकता होती.

आरुषी-हेमराज हत्याप्रकरणात चार वर्षांची शिक्षा भोगलेल्या राजेश आणि नुपूर तलवार यांनी, जेलमध्ये कमावलेले  99 हजार रुपये त्यांनी कैद्यांच्या कल्याणासाठी जेल प्रशासनाला दान केले आहेत.  तलवार दाम्पत्य सुमारे 1417 दिवस तुरुंगात राहिले. या दिवसात त्यांनी कैद्यांना वैद्यकीय सेवा दिल्या. यातून कमावलेली रक्कम घेण्यास दाम्पत्याने इन्कार केलाय.

तलवार दाम्पत्याची दर 15 दिवसांनी जेलवारीप्रशासनाने तलवार दाम्पत्याला दर 15 दिवसांनी कारागृहातील कैद्यांना तपासायला येण्याची विनंती केली होती. तलावार दापत्याने त्यांची ही विनंती मान्य केली आहे, असं कारागृहाचे डॉक्टर सुनिल त्यागी यांनी संगितलं. त्यामुळे तलावार दाम्पत्याला दर 15 दिवसांनंतर कारागृहात यावं लागणार आहे

काय आहे हे प्रकरण ?तलवार दाम्पत्याची एकुलती एक मुलगी आरुषी तलवार हिची 2008 रोजी हत्या करण्यात आली होती. नोएडा जलवायू विहार एल-32 मध्ये तलवार हे कुटुंब राहत होते. 16 मे 2008च्या सकाळी आरुषी तिच्या बेडरुममध्ये मृतावस्थेत सापडली होती. तिची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. तलवार यांच्या घरी काम करणारा नोकर हेमराज गायब असल्याने सर्वप्रथम त्याच्यावर हत्येचा संशय होता. पण दुस-या दिवशी 17 मे रोजी घराच्या गच्चीवर हेमराजचा मृतदेह सापडला. या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने 26 नोव्हेंबर 2013 रोजी आरुषीचे आई-वडील राजेश आणि नुपूर तलावर यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र अलाहाबाद न्यायालयाने आरुषीच्या आई-वडिलांची निर्दोष मुक्तता केलीय. तरीही संपूर्ण प्रकरणाबद्दल रहस्य कायम आहे. 

- आरुषी व हेमराज हत्या प्रकरणाचा असा आहे घटनाक्रम 16 मे 2008- 14 वर्षांची आरुषी तलवार नोएडातील जलवायू विहार एल-32 या स्वतःच्या घरातील बेडरूमममध्ये मृतावस्थेत सापडली. तिचा गळा चिरण्यात आला होता. त्यावेळी नोकर हेमराजवर संशय घेण्यात आला.17 मे 2008- नोकर हेमराज याचाही मृतदेह नोएडातील जलवायू विहार एल-32 गच्चीवर सापडला.23 मे 2008 - आरुषीचे वडील डॉ. राजेश तलवार यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी आरुषी व हेमराज हत्या प्रकरणात अटक केली.1 जून 2008-आरुषी व हेमराज हत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं.13 जून 2008- डॉ. राजेश तलवारचे कम्पाऊंडर कृष्णाला सीबीआयनं अटक केली. त्यानंतर तलवार यांचे मित्र दुर्रानी यांच्या घरातील नोकर राजकुमार व तलवार यांच्या शेजारील नोकर विजय मंडल यांनाही अटक करण्यात आली. तिघांनाही हत्याकांडातील आरोपी बनवण्यात आलं. 11 जुलै 2008- राजेश तलवार यांना गाझियाबादच्या डासना जेलमधून जामिनावर सोडण्यात आलं.12 सप्टेंबर 2008- कृष्णा, राजकुमार व विजय मंडळ यांना कनिष्ठ न्यायालयातून जामीन मिळाला. सीबीआयनं 90 दिवस चार्जशीट फाइल केली नाही. त्यानंतर 2009मध्ये सीबीआयनं दुसरी टीम बनवून त्यांच्याकडे प्रकरण सुपूर्द केलं.10 सप्टेंबर 2010- आरुषी हत्याकांड प्रकरणातील चौकशीसाठी सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट बनवली29 डिसेंबर 2010- सीबीआयनं आरुषी हत्याकांड प्रकरणात दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला.28 फेब्रुवारी 2011- सीबीआय कोर्टानं राजेश व नुपूरविरोधात अटक वॉरंट जारी केलं. राजेश तलवार यांनी सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयात निषेध याचिका दाखल केली.मार्च 2012- कनिष्ठ न्यायालयानं क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावत आरुषीचे आई-वडील राजेश व नूपुर तलवार यांना हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी दोषी ठरवलं.17 सप्टेंबर 2012- गाझियाबादच्या डासना जेलमध्ये शिक्षा भोगत असलेली आरुषीची आई नुपूर हिला न्यायालयानं जामीन दिला.25 मे 2012- गाझियाबाद न्यायालयानं आरुषी व हेमराज हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा राजेश व नुपूरवर ठपका ठेवला.30 एप्रिल 2012- नुपूर यांनी स्वतः आत्मसमर्पण केलं, त्यानंतर नुपूर यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं.एप्रिल 2013- आरुषी व हेमराज यांचा खून केल्याचं सीबीआयनं न्यायालयात सांगितलं. तसेच आरुषी व हेमराज यांचे मृतदेह विचित्र अवस्थेत सापडले.3 मे 2013- बचाव पक्षानं वकिलांच्या मागणीनुसार विशेष न्यायालयात सीबीआयचे माजी संचालक अरुण कुमार यांच्यासह 14 जणांना समन्स बजावला, मात्र सीबीआयनं याला विरोध केला. 13 मे 2013 - त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं तलवार दाम्पत्याची याचिका फेटाळून लावली.10 ऑक्टोबर 2013- गाझियाबादमधील सीबीआय कोर्टात सुनावणी सुरू झाली.26 नोव्हेंबर 2013- आरुषीचे आई-वडील राजेश आणि नुपूर तलावर यांना सीबीआयनं कोर्टानं दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली21 जानेवारी 2014 - राजेश व नुपूर यांनी सीबीआय कोर्टानं सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली.19 मे 2014- अलाहाबाद कोर्टानं राजेश व नुपूर तलवार यांचा जामीन फेटाळून लावत सुनावणी सुरूच ठेवली.7 सप्टेंबर 2017- अलाहाबाद न्यायालयानं आरुषी हत्या प्रकरणातील निर्णय राखून ठेवला.12 ऑक्टोबर 2017- अलाहाबाद न्यायालयानं पुराव्याअभावी राजेश व नुपूर दाम्पत्याची निर्दोष मुक्तता केली.

टॅग्स :Courtन्यायालय