शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Jaya Bachchan : 'तुमचे वाईट दिवस लवकरच येणार', जया बच्चन यांनी भाजपाला दिला 'शाप'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 20:17 IST

Jaya Bachchan : नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक पदार्थ विधेयक 2021 वर सभागृहात चर्चा सुरू असताना जया बच्चन या राज्यसभेत आक्रमक झालेल्या दिसून आल्या.

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन  (Jaya Bachchan) यांनी आज राज्यसभेत सत्ताधारी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. लवकरच तुम्हा लोकांचे वाईट दिवस येणार आहेत, अशा शब्दांत जया बच्चन यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक पदार्थ विधेयक 2021 वर सभागृहात चर्चा सुरू असताना जया बच्चन या राज्यसभेत आक्रमक झालेल्या दिसून आल्या. त्यांनी सरकारला वाईट दिवस येण्याचा शापही दिला.

दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) अंमलबजावणी संचालनालयात हजर झाल्यानंतर जया बच्चन यांची ही टिप्पणी आली आहे. यावेळी, माझ्यावर वैयक्तिकरित्या टीका करण्यात आली, पण मला कोणावरही वैयक्तिक टीका करायची नाही, असे जया बच्चन यांनी राज्यसभेत सांगितले. तसेच, मी तुम्हा लोकांना शाप देते की तुमचे वाईट दिवस लवकरच येणार आहेत, असे म्हणत भाजपा नेत्यांवर हल्लाबोल केला. यानंतर सभागृहातील गदारोळ झाला आणि सभापतींनी सभागृहाचे कामकाज पाच वाजेपर्यंत तहकूब केले. 

सभागृहाचा अपमान केल्याचा आरोपभाजपा खासदार राकेश सिन्हा यांनी जया बच्चन यांच्यावर संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा आरोप केला आहे. तसेच, जया बच्चन यांनी राज्यसभेच्या सभापतींना वैयक्तिकरित्या संबोधित केल्याचा आरोपही राकेश सिन्हा यांनी केला. कोणत्याही खासदाराने सभागृहात असे वागू नये, असे वागणे म्हणजे सभापतींचा अपमान आहे, असे  राकेश सिन्हा म्हणाले. 

पनामा पेपर्स प्रकरणी ऐश्वर्या राय बच्चनची चौकशी 2016 च्या पनामा पेपर्स लीक प्रकरणी ऐश्वर्या राय बच्चन सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाली होती. सोमवारी सकाळी सुरु झालेली ही चौकशी संध्याकाळी 7 च्या सुमारास संपली. यावेळी माध्यमांशी ऐश्वर्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने माध्यमांशी बोलणे टाळले. ऐश्वर्या राय बच्चन हिची अंमलबजावणी संचालनालयाकडून फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) अंतर्गत चौकशी केली जात आहे. याआधीही ऐश्वर्या रायने दोन वेळा ईडीसमोर हजर राहण्यास असमर्थता व्यक्त केली होती.

पनमा पेपर्स लीक प्रकरणात कुणाची नावे?या प्रकरणात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, डीएलएफचे केपी सिंह, इक्बाल मिर्ची आणि उद्योगपती अदानी यांच्या ज्येष्ठ बंधूंचा समावेश असल्याचे म्हटले  जात आहे. या प्रकरणात बच्चन कुटुंबियांचे नाव समोर आल्यानंतर त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सध्या अंमलबजावणी संचालनालयाकडून केली जात आहे.

पनामा पेपर्स लीक प्रकरण नेमकं काय?पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे 500 लोकांचा समावेश होता. यामध्ये देशातील नेते, चित्रपट अभिनेते, खेळाडू, उद्योगपती, प्रत्येक वर्गातील नामवंत व्यक्तींची नावे आहेत. या सर्व लोकांवर करचुकवेगिरीचा आरोप आहे. ज्याच्या मदतीने एजन्सी आता आपले काम करत आहे.

टॅग्स :Jaya Bachchanजया बच्चनRajya Sabhaराज्यसभा