दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या फोटोवरुन नवा वाद; आपने करुन दिली पंचायतमधल्या फुलेराची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 14:56 IST2025-09-08T14:44:55+5:302025-09-08T14:56:47+5:30
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या एका फोटोवरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या फोटोवरुन नवा वाद; आपने करुन दिली पंचायतमधल्या फुलेराची आठवण
Delhi CM Rekha Gupta: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर सिव्हिल लाईन्स या सरकारी निवासस्थानी साप्ताहिक जनसुनावणी दरम्यान हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आता आम आदमी पक्षाने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये रेखा गुप्ता यांचे पती बसल्याचा आरोप आपने केला आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचे पती सरकारी बैठकीत उपस्थित असल्याचा फोटो समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. आपचे दिल्ली प्रभारी सौरभ भारद्वाज यांनी मुख्यमंत्र्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून घेतलेले फोटो इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये शेअर केले आहेत ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे पती मनीष गुप्ता हे अधिकाऱ्यांच्या सोबतच्या अधिकृत आढावा बैठकीदरम्यान त्यांच्या शेजारी बसलेले दिसत आहेत. यावरुनच आपने दिल्ली सरकारची तुलना प्रसिद्ध वेब सिरीज 'पंचायत' मधील फुलेरा गावाशी केली.
फुलेरामधील पंचायत सरकार सुरू आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता एक बैठक घेतात. सर्व अधिकारी आणि कर्मचारी या बैठकीला उपस्थित राहतात. पण त्यांचे पती मनीष गुप्ता मुख्यमंत्र्यांच्या शेजारी खुर्चीवर बसले आहेत, अशी टीका आम आदमी पक्षाने केली.
दिल्ली सरकार बनी फुलेरा पंचायत
— Saurabh Bharadwaj (@Saurabh_MLAgk) September 7, 2025
जैसे फुलेरा की पंचायत में महिला प्रधान के पति प्रधान की तरह काम करते थे , आज दिल्ली में CM के पति आधिकारिक मीटिंग में बैठ रहे हैं ।
हमने पहले भी बताया था कि CM आले पति आधिकारिक मीटिंग में बैठते हैं , अधिकारियों के साथ मीटिंग और इंस्पेक्शन करते… pic.twitter.com/40D3kz5OXU
"ज्याप्रमाणे फुलेरा पंचायतीत महिला प्रमुखाचा पती प्रमुख म्हणून काम करत असे, त्याचप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांचे पती दिल्लीत अधिकृत बैठकांमध्ये बसतात. आम्ही आधी असेही सांगितले होते की मुख्यमंत्र्यांचा पती अधिकृत बैठकांमध्ये बसतो, अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतो. हे पूर्णपणे असंवैधानिक आहे. अशाप्रकारे देशाच्या राजधानीत लोकशाही आणि संवैधानिक व्यवस्थेची थट्टा केली जात आहे," अशीही टीका आप नेते सौरभ भारद्वाज यांनी केली.