शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

Farmers Protest: “आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात PM मोदीजी?”; लखीमपूर घटनेवरून विरोधक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 09:45 IST

विरोधकांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देसत्तेची अशी नशा, धुंदी आजपर्यंत कुणी पाहिली नसेलआणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात PM मोदीजीआंदोलन थोपवता आले नाही, म्हणून आता शेतकऱ्यांनाच चिरडून टाकले

नवी दिल्ली: वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात गेल्या १० महिन्यांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीतील सीमांवर आंदोलन सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि आंदोलक शेतकरी नेते आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. अलीकडेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्तरेतील राज्यांत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यानंतर आता उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यात शेतकरी आंदोलनात वाहन शिरल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर काही शेतकरी जखमी झाले आहेत. यावरून विरोधकांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला असून, आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात PM मोदीजी, अशी विचारणा केली आहे. (aap sanjay singh criticised centre modi govt over farmers protest)

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि गृह राज्यमंत्री अजय मिश्र टोनी यांच्याविरोधात लखीमपूर खिरी जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र, या आंदोलनात एक कार घुसली आणि यामध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर आठ शेतकरी जखमी झाले. दुसरीकडे भारतीय किसान युनियन यांनी दावा केला आहे की, या दुर्घटनेत ३ शेतकरी मारले गेले आहेत. शेतकरी आंदोलनानंतर परतत असताना त्यांच्यावर वाहनाने हल्ला करण्यात आला, असा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे. 

आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात PM मोदीजी

या प्रकारानंतर आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सत्तेची अशी नशा, धुंदी आजपर्यंत कुणी पाहिली नसेल किंवा ऐकीवात नसेल. आंदोलक शेतकऱ्यांवर मंत्र्याच्या मुलाने कार चढवली. यामध्ये तीन आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात PM मोदीजी. गुन्हेगारांना अटक करून सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी. कुटुंबांना नुकसानभरपाई द्या, अशी मागणी सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. 

दरम्यान, आंदोलन थोपवता आले नाही, म्हणून आता शेतकऱ्यांनाच चिरडून टाकले. या नरसंहारावर जी लोक मूग गिळून गप्प बसलीत, त्यांनी या कालचक्राचा फेरा कायम स्मरणात ठेवावा, त्यांनाही अशाच प्रकारे एक दिवस निशाण्यावर घेतले जाईल. या प्रकरणाला सरळपणे पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे गृह राज्यमंत्री अजय मिश्र टोनी जबाबदार आहेत, या शब्दांत युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. वी. यांनी हल्लाबोल केला.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथAAPआपUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण