शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

‘आप’ आमदार अमानतुल्लाह खान हिस्ट्रीशीटर घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 7:39 AM

जामिनावर सुटका : दहा वर्षांत आप नेत्यांवर २०० हून अधिक गुन्हे 

- शरद गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : दिल्लीतील ओखलामधील आमदार अमानतुल्लाह खान यांना शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी हिस्ट्रीशीटर घोषित केले. मदनपूर खादर भागात बुलडोझरने अतिक्रमण हटविण्याला ते विरोध करत होते. त्यांच्याविरुद्ध १८ गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले. 

विशेष म्हणजे, न्यायालयाने अमानतुल्लाह खान यांची शुक्रवारी जामिनावर सुटका केली. त्यांचे वकील मोहम्मद इरशाद यांचे म्हणणे आहे की, तीनही प्रकरणांत जामीन मिळू शकतो. अन्य १५ प्रकरणे न्यायालयाकडून यापूर्वीच फेटाळण्यात आले आहेत. हिस्ट्रीशीटर घोषित करण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देऊ. 

२०१३ मध्ये प्रथम ‘आप’चे सरकार स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत पक्षाच्या आमदारांविरुद्ध २०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. यातील ७२ प्रकरणांत तथ्य न आढळल्याने न्यायालयाने ही प्रकरणे फेटाळली, तर ४८ प्रकरणे अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत. उर्वरित प्रकरणांत न्यायालयाने स्थगिती दिली आहे अथवा आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध दिल्ली, मुंबई, बंगळुरु, गुवाहाटी आणि उत्तर प्रदेशात एकूण ३० पेक्षा अधिक प्रकरणे दाखल आहेत. यातील १२ गुन्हेगारी स्वरूपाचे, मानहानीचे होते. यातील चार प्रकरणांत त्यांची निर्दोष सुटका झाली, तर चार प्रकरणांत त्यांनी माफी मागितली. २०१४ मध्ये राजभवनासमोर धरणे आंदोलन, दिल्लीच्या मुख्य सचिवांना मारहाण ही प्रकरणे प्रलंबित आहेत. 

आपच्या अनेक नेत्यांवर दाखल आहेत गुन्हेउपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध १२ गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत. आपचे कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन, गोपाल राय आणि कैलाश गहलोत यांच्याविरुद्धही दंगल आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान ही प्रकरणे प्रलंबित आहेत. 

‘आप’चे राज्यसभा सदस्य संजय सिंह सांगतात की, आपल्याविरुद्ध आतापर्यंत पंजाब, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात ५० पेक्षा अधिक प्रकरणे दाखल आहेत. त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, अशाप्रकारे बनावट प्रकरणे दाखल करून आपच्या नेत्यांचा सामाजिक संकल्प आणखी मजबूत होत आहे.

टॅग्स :AAPआप