शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

लाभाचे पद भोवले : ‘आप’चे २० आमदार ठरले अपात्र'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 03:55 IST

‘संसदीय सचिव’ हे लाभाचे पद भूषविल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली विधानसभेतील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या (आप) २० आमदारांचे सदस्यत्व रद्द केले.

नवी दिल्ली : ‘संसदीय सचिव’ हे लाभाचे पद भूषविल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली विधानसभेतील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या (आप) २० आमदारांचे सदस्यत्व रद्द केले. विधानसभेत ७० पैकी ६६ आमदार असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या सरकारला या निर्णयाने धोका नसला, तरी केजरीवाल यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. त्यांनी राजीनामा देण्याच्या मागण्यालगेच सुरूही झाल्या. राष्ट्रपतींचा हा निर्णय घटनाबाह्य व लोकशाहीसाठी घातकअसल्याची भूमिका ‘आप’ने घेतली आहे.आम आदमी पार्टीच्या २० आमदारांना अपात्र घोषित करावे, अशी शिफारस निवडणूक आयोगाने केली होती. राष्ट्रपतींनी त्यास लगेच संमती दिली. त्यामुळे या आमदारांचे सदस्यत्व जाणे अपरिहार्य आहे.या कारवाईविरुद्ध ‘आप’ने न्यायालयात धाव घेतली आहेच. तेथे स्थगिती न मिळाल्यास या २० जागांसाठी पोटनिवडणुका घ्याव्या लागतील.ज्या २० आमदारांना अपात्र घोषित केले गेले, त्यांनी १३ मार्च २०१५ ते ८ सप्टेंबर २०१८ या कालावधीत ‘संसदीय सचिव’ हे पद भूषविले होते. हे लाभाचे पद असल्याने त्यांना अपात्र ठरवावे, यासाठी प्रशांत पटेल या वकिलाने राष्ट्रपतींकडे याचिका दाखल केली होती. ही याचिका राष्ट्रपतींनी निवडणूक आयोगाकडे वर्ग केली होती.पटेल यांचे म्हणणे ग्राह्य धरून निवडणूक आयोगाने आपच्या २० आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस राष्ट्रपतींना केली होती. पटेल यांनी २१ आमदारांना अपात्र ठरवावे, अशी मागणी केली होती, पण त्यातील एका आमदाराने आधीच राजीनामा दिला आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या शिफारसींना राष्ट्रपतींना बांधील असतात. त्यामुळे ही शिफारस राष्ट्रपतींनी मंजूर केली.आता लक्ष हायकोर्टाकडे आयोगाच्या शिफारशीस स्थगिती द्यावी, अशी याचिका ‘आप’ने दिल्ली उच्च न्यायालयात केली होती. मात्र, यावर अंतिम निर्णय व्हायचा असल्याने, न्यायालयाने अंतरिम स्थगितीस नकार दिला होता. आता यावर सोमवारी सुनावणी व्हायची आहे. आता आम्हाला न्यायालयाकडूनच दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया आपचे मंत्री व अपात्र ठरलेल्यांपैकी एक मदनलाल यांनी व्यक्त केली.वेतन, भत्ते निकष नाही-मंत्र्यांच्या त्यांच्या कामात मदत करण्याचे काम संसदीय सचिवांचे असते. या आमदारांनी संसदीय सचिवपद स्वीकारलेले असले, तरी त्यांनी या कामासाठी वेतन किंवा भत्ते कधीही घेतले नाहीत असा दावा ‘आप’ने केला होता. मात्र, तो अमान्य करताना आयोगाने म्हटले की, अपात्रतेसाठी वेतन व भत्ते घेणे हा निकष नाही. संबंधित पद हे ‘लाभा’चे असणे पुरेसे आहे. यासाठी आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या जया बच्चन प्रकरणातील निकालाचा संदर्भ दिला होता.यांची आमदारकी गेली-आदर्श शास्त्री, अलका लांबा, अनिल वाजपेयी, अवतार सिंग, कैलाश गहलोत, मदनलाल (विद्यमान मंत्री), मनोजकुमार, नरेश यादव, नितीन त्यागी, प्रवीणकुमार, राजेश गुप्ता, राजेश ऋषी, संजीव झा, सरिता सिंग, सोमदत्त, शरदकुमार, शिवचरण गोयल, सुखबीरसिंग, विजेंदर गर्ग, जर्नेलसिंग.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा