शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर, कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे तर...
2
पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेचीही वाहतूक विस्कळीत, सीएसएमटी स्थानकात तांत्रिक बिघाड
3
एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?
4
“अब की बार फिर मोदी सरकार”; भारतातील लोकसभा निवडणुकीच्या Exit Poll वर चीनची प्रतिक्रिया
5
एक्झिट पोलसारखेच वातावरण राहिले तर महाराष्ट्र विधानसभेला काय होणार? ठाकरेंची चारही बोटे तुपात...
6
"पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकवून दे...", माजी खेळाडूचं बाबरला आव्हान अन् बोचरी टीका
7
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
8
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
9
Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी
10
अंध:कार दूर होणार, मोदी जाणार, भाजपा २२५ वर अडणार, तर इंडिया आघाडी..., सामनाचा दावा
11
T20 WC 2024 : पोलार्ड इंग्लंडच्या ताफ्यात! गतविजेत्यांना पुन्हा एकदा चॅम्पियन करण्यासाठी मैदानात
12
Anil Ambaniच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी; रिलायन्स पॉवर, इन्फ्रामध्ये जोरदार वाढ; जाणून घ्या?
13
Gold Price Today: ३ जून रोजी स्वस्त झालं Gold, निवडणुकांच्या निकालापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण
14
“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा
15
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला
16
“थोरातांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते, स्वतःला नेते समजतात पण...”: राधाकृष्ण विखे पाटील
17
रवीना टंडनवर झालेल्या खोट्या आरोपांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, "ही धोक्याची घंटा..."
18
Exit Poll सुद्धा 'कन्फ्युज'! महाराष्ट्राचा नेमका कौल असणार तरी काय?
19
आरोग्य सांभाळा! जास्त तहान लागत असेल तर सावधान; 'या' ५ आजारांचा वाढू शकतो धोका
20
अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून आहे, त्यामुळे संयम ठेवा; Sania Mirza ची पोस्ट

‘झाडू’ बिघडवू शकतो भाजपपेक्षा काँग्रेसचे गणित; राष्ट्रीय दर्जाही मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 6:08 AM

आगामी विधानसभा निवडणुका लक्ष्य 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आम आदमी पार्टीने (आप) गुजरातमध्ये पदार्पणातच ५ जागा मिळविल्या. आपने गुजरातमध्ये १२.९ टक्के मते मिळविली़. त्यामुळे काँग्रेसचे गणित बिघडले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला ४२.२ टक्के मतांसह ७७ जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र, केवळ २७.३ टक्के मते आणि १७ जागा मिळाल्या आहेत. आपमुळे इतरही अनेक राज्यात काँग्रेसचे गणित असेच बिघडू शकते.

गुजरात निवडणुकीमुळे आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकात आप पूर्ण शक्तिनिशी उतरू शकते. 

आपचे तीन खास घटकnमुस्लीम मते : भाजपला मत न देऊ इच्छिणाऱ्या अल्पसंख्याक मतदारांना काँग्रेसशिवाय नवीन पर्याय मिळू शकतो.nआदर्श राज्य : दिल्लीतील विकासाचे मॉडेल दाखवून आप डाव खेळत आहे. त्यामुळे इतर पक्षांना विकासाच्या मुद्द्यावर यावे लागत आहे.nनवे चेहरे : नवे चेहरे देऊन आप अँटी इनकम्बन्सीचा लाभ उठवित आहे.

‘त्या’ जागांवर आपचा डोळागेल्या निवडणुकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील कमी अंतराने निकाल लागलेल्या जागांवर आपचा डोळा आहे. तेथील गणित आपमुळे बदलू शकते. ५ टक्क्यांपेक्षा कमी फरकाने हार-जीत झालेल्या जागा राजस्थानात ५८, मध्य प्रदेशात ७१ आणि छत्तीसगडमध्ये १८ होत्या. या जागांवर आप जाेर लावू शकते. 

या राज्यांमध्ये आपला आहे संधीगुजरातप्रमाणेच या राज्यांतही काँग्रेसला फटका बसू शकतो. या राज्यांत आतापर्यंत भाजप आणि काँग्रेस यांच्यातच मुख्य मुकाबला होत आला आहे. बसपा तिसरा राष्ट्रीय पक्ष असला, तरी येथे त्याची उपस्थिती नगण्य आहे. प्रादेशिक पक्षही येथे मजबूत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी आपला संधी आहे. 

टॅग्स :AAPआपcongressकाँग्रेस