शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

आमिर खानला स्वाईन फ्लूची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2017 7:35 PM

बॉलिवूड अभिनेता आमिर खानला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.  त्याने स्वत: ही माहिती दिली.

मुंबई, दि. 6 - बॉलिवूड अभिनेता आमिर खानला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.  त्याने स्वत:ही माहिती दिली. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या परितोषिक वितरण सोहळ्यात, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाला. यावेळी त्यानं आपल्या अनुपस्थितीबाबत सांगताना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याची माहिती दिली. याच कार्यक्रमात आमिरनं त्याची पत्नी किरण रावलाही स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं सांगितलं. स्वाईन फ्लू झालेल्या रूग्णाला आराम करण्याची आणि औषधं घेण्याची आवश्यकता असते. त्याचमुळे आपण पाणी फाऊंडेशच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात हजर राहू शकलो नाही असं आमिर खाननं म्हटलं आहे. तसंच सगळ्या विजेत्यांचे त्यानं आभारही मानले आहेत

आज पुण्यातील बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये पाणी फाऊंडेशनच्या वतीने राज्यातील 13 जिल्ह्यांतील 30 तालुक्यामधील 1300 पेक्षा अधिक गावांमध्ये घेण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रम सुरु आहे. या समारंभाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता अतुल कुलकर्णी, शाहरुख खानसह दिग्गज उपस्थित होते.

बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये सकाळपासूनच राज्याच्या कानाकोपरयातून नागरिक आले आहेत. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केलं. पाणी फाऊंडेशनच्या कामातून अशक्य ते शक्य केलं. मराठी माणूस जे बोलतो ते करून दाखवतो. महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठं काम झालं आहे. रिलायन्स फाऊंडेशन यापुढंही मदत करणार असल्याचे यावेळी निता अंबानी यांनी स्पष्ट केलं.