शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’मधील यादवी तीव्र!

By admin | Updated: March 12, 2015 01:58 IST

आम आदमी पार्टीत (आप)आलेल्या भूकंपाचे हादरे अजूनही थांबले नसून पक्षावरील राजकीय संकट अधिक वाढले आहे.मुंबईत पक्षाचा चे

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीत (आप)आलेल्या भूकंपाचे हादरे अजूनही थांबले नसून पक्षावरील राजकीय संकट अधिक वाढले आहे.मुंबईत पक्षाचा चेहरा राहिलेल्या अंजली दमानिया यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गेल्या वर्षी सरकार स्थापनेसाठी काँग्रेसचे सहा आमदार खरेदीचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत बुधवारी आपला सोडचिठ्ठी दिल्याने या पक्षाला मोठा हादरा बसला आहे. दुसरीकडे एका आमदाराने शांती भूषण आणि प्रशांत भूषण यांच्यासह योगेंद्र यादव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यासाठी हस्ताक्षर मोहीम सुरू केली आहे.आपण अरविंद केजरीवाल यांना सिद्धांतांसाठी पाठिंबा दिला होता घोडेबाजारासाठी नाही, अशी तोफ दमानिया यांनी पक्ष सोडताना डागली आहे. केजरीवाल यांनी गेल्या वर्षी दिल्लीत सरकार स्थापनेसाठी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याची गोष्ट केली होती, असा आरोप या पक्षाचे रोहिणी येथील माजी आमदार राजेश गर्ग यांनी केला आहे. आपल्या या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी केजरीवाल यांनी यासंदर्भात केलेल्या संभाषणाची आॅडिओ क्लिपही जारी केली आहे. दमानिया यांनी याच क्लिपचा हवाला देऊन राजीनामा दिला.राजेश गर्ग यांच्या म्हणण्यानुसार विद्यमान उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया काँग्रेस आमदारांच्या संपर्कात होते आणि त्यांना एक नवा राजकीय पक्ष स्थापन करून आपला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी चिथावत होते. कारण केजरीवाल यांना पुन्हा विधानसभा निवडणुका नको होत्या. त्यांनी पुराव्यादाखल जारी केलेल्या आॅडिओ क्लिपमध्ये केजरीवाल हे ‘आम्ही सरकार स्थापन करण्यास तयार आहोत. परंतु काँग्रेस आम्हाला पाठिंबा देण्यास तयार नाही. मनीष सिसोदिया काँग्रेसच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमध्ये फूट पाडा. सहा आमदारांना नवा पक्ष स्थापन करून आपल्याला पाठिंबा देण्यास सांगा’असे स्पष्ट सांगत आहेत. पक्षांतरविरोधी कायद्यापासून बचावाकरिता पक्षातून बाहेर पडणाऱ्या गटात किमान सहा आमदार असणे आवश्यक होते.