आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल, म्हणाले- "श्रीराम आमच्यासाठी आस्थेचा विषय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 13:09 IST2022-06-15T13:09:13+5:302022-06-15T13:09:21+5:30

Aaditya Thackeray: "गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही अयोध्येत येत आहोत. आतादेखील मी फक्त श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला आलोय.''

Aaditya Thackeray: Shivsena leader Aaditya Thackeray Ayodhya visit, he will visit lord Ram Temple | आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल, म्हणाले- "श्रीराम आमच्यासाठी आस्थेचा विषय..."

आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल, म्हणाले- "श्रीराम आमच्यासाठी आस्थेचा विषय..."

लखनौ: शिवसेने नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray)  आज अयोध्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते भगवान श्री रामाचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान, आज सकाळी 11 वाजता आदित्य ठाकरेंचे विमान लखनौ विमानतळावर दाखल झाले. 

विमानतळाच्या बाहेर पडताच आदित्य ठाकरेंना माध्यम प्रतिनिधींनी घेरले. यावेळी त्यांना अयोध्या दौऱ्याचा उद्देश विचारण्यात आला. त्यावर आदित्य म्हणाले की, ''आज मी अयोध्येत फक्त रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. यात राजकारणाचा कोणताही भाग नाही. हा आमच्यासाठी श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही अयोध्येत येत आहोत. आतादेखील मी फक्त श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला आलोय,'' असं आदित्य म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, "श्रीरामाच्या अयोध्या भूमीत मी कोणतेही राजकीय आरोप-प्रत्यारोप करणार नाही. आमच्या हातातून चांगले कार्य घडू दे, एवढीच प्रार्थना श्रीरामाच्या चरणी करणार आहे. यावेळी त्यांनी 'जय सियाराम'चा नाराही दिला. आदित्य ठाकरे लखनऊ विमानतळावर आल्यानंतर शिवसैनिकांकडून त्यांचे ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे.

शरयू नदीकाठी शक्तिप्रदर्शन
आदित्य ठाकरे आज दुपारी रामलल्लाचे दर्शन घेणार असून तत्पूर्वी रामनगर येथील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्णाचे दर्शन घेणार आहेत. या दौऱ्यानिमित्ताने बुधवारी रात्री युवासेनेकडून शरयू नदीच्या काठी जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. यासाठी मंगळवार सकाळपासून शिवसैनिक मोठ्या प्रमाणात लखनऊत दाखल झाले आहेत. 

Web Title: Aaditya Thackeray: Shivsena leader Aaditya Thackeray Ayodhya visit, he will visit lord Ram Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.