साधूंना मिळणार अनुदानित गॅस सिलिंडर !
By Admin | Updated: July 19, 2015 21:24 IST2015-07-19T21:24:27+5:302015-07-19T21:24:27+5:30
शासन भरणार पैसे : अनिर्बंध वापराची परवानगी

साधूंना मिळणार अनुदानित गॅस सिलिंडर !
श सन भरणार पैसे : अनिर्बंध वापराची परवानगी नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आलेल्या साधूंना इंधन म्हणून गॅस सिलिंडर देण्यास राज्य सरकार राजी झाले असून, त्यासाठी साधुग्राममध्येच दोन गॅस एजन्सीचे सेंटर उघडण्यात येणार आहेत.साधूंसाठी राज्य सरकार विना अनुदानित दरात गॅस कंपनीकडून सिलिंडर खरेदी करेल व साधूंना अनुदानित भावानेच ते उपलब्ध करून देणार आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत साधूंनी किती सिलिंडर वापरावे यावर मात्र कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही.सिंहस्थासाठी येणार्या साधू-महंतांसाठी यापूर्वीच केंद्र सरकारने अन्नधान्य म्हणजेच गहू व तांदळाचा साठा उपलब्ध करून दिला आहे. मात्र गॅस सिलिंडर कोणत्या दराने उपलब्ध करून द्यावे, याबाबत शासन पातळीवरूनच निर्णय होत नसल्याने हा प्रश्न प्रलंबित होता. कुंभमेळा निधीतून सिलिंडरची रक्कम अदा करण्याचे ठरविण्यात आले व तसे आदेशही पुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत. गॅस ग्राहकांना मिळणार्या दरातच साधूंनाही सिलिंडर मिळणार आहे. मात्र अनुदानाची रक्कम वगळता उर्वरित रक्कम शासनाकडून गॅस एजन्सीला रोख स्वरूपात दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)-----------------तात्पुरते कनेक्शनगॅस सिलिंडरसाठी प्रत्येक आखाडा, खालसे व धार्मिक संस्थांना तात्पुरचे गॅस कनेक्शन घ्यावे लागेल. त्यासाठी अनामत रक्कम भरावी लागेल. कुंभमेळ्यानंतर सिलिंडर जमा केल्यानंतर अनामत रक्कम परत मिळेल.--------------तात्पुरती शिधापत्रिका साधुग्राममधील प्लॉटचे वाटप पूर्ण झाल्यानंतर साधूंना तात्पुरती शिधापत्रिका पुरवठा खात्याकडून दिली जाणार आहे. त्यावर प्रती व्यक्ती पाच किलो धान्य मिळेल.