शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

कुत्र्याची होती ॲलर्जी, घरापासून दूर ठेवण्यास सासूने नकार दिल्याने सुनेने मुलीसह केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 17:41 IST

कर्नाटकातील बंगळुरू येथील एका महिलेने १३ वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केली आहे. 

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मानवतेला लाजवेल अशा या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कारण इथे एका महिलेने १३ वर्षांच्या चिमुकल्या मुलीसह आत्महत्या केली आहे. सासूने कुत्र्याला घरापासून लांब न ठेवल्याने महिलेने टोकाचे पाऊल उचलले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला गृहिणी असून तिची मुलगी इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होती. ही महिला पती आणि सासूसोबत घरात राहत होती. याशिवाय त्यांच्या घरात एक कुत्रा देखील होता आणि हाच कुत्रा आत्महत्येचे प्रमुख कारण ठरला आहे. खरं तर मृत महिलेला श्वसनाचा आजार होता, त्यामुळे डॉक्टरांनी तिला कुत्र्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. तिलाही कुत्र्याभोवती अस्वस्थ वाटायचे. त्यामुळे तिने आधी पतीशी बोलून नंतर सासूला याबाबत सांगितले. मात्र सूनेला त्रास होत असताना देखील सासूने कुत्र्याला घरापासून लांब ठेवण्यास नकार दिला. 

चिमुकल्या मुलीसह संपवले जीवन यावरूनच एके दिवशी घरात मोठा वाद सुरू झाला. संबंधित महिलेने घरातील लोकांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला होता. परंतु तिचा प्रयत्न निष्फळ ठरला. अखेर तिने तिच्या चिमुकल्या मुलीसह तिचे जीवन संपवले. याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मृत महिलेच्या सासरच्या मंडळींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकBengaluruबेंगळूरCrime Newsगुन्हेगारीdogकुत्राWomenमहिला