शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

भारीच! रामललाच्या मूर्तीचे डोळे मिचकावले! AI चा चमत्कार; रामभक्तांचा आनंद गगनात मावेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 18:10 IST

संपूर्ण भारतभर २२ जानेवारी हा दिवस सण म्हणून साजरा करण्यात आला.

उत्तर प्रदेशातील अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन झाले आहे. संपूर्ण भारतभर २२ जानेवारी हा दिवस सण म्हणून साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी दिवाळीसारखा जल्लोष करण्यात आला. अयोध्याशिवाय इतरही शहरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या अभिषेक सोहळ्यात औपचारिकपणे सहभागी झाले. विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत हा बहुचर्चित कार्यक्रम पार पडला. सोमवारच्या दिवसाचे आकर्षण ठरले ते रामललाची मूर्ती. रामललाच्या मूर्तीचे दर्शन अभिषेक होण्यापूर्वी सर्व देशवासियांना झाले.

प्रभू श्रीरामाची मूर्ती अतिशय मनमोहक आहे. या ५१ इंचाच्या मूर्तीची झलक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अशातच एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधत आहे, ज्यामध्ये रामलला डोळे मिचकावताना दिसत आहेत. AI च्या माध्यमातून केलेला हा व्हिडीओ सर्वांना भुरळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये रामलला पापण्या मिचकावताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये प्रभू रामाची मनमोहक अभिव्यक्ती दिसते आहे.

दरम्यान, सोमवारी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा समारंभ पार पडला. प्रभू श्रीराम नव्या आणि भव्य-दिव्य मंदिराच्या गर्भगृहात विराजमान झाले आहेत. प्राणप्रतिष्ठा समारंभानंतर अयोध्येत भाविकांनी मोठी गर्दी केली. संपूर्ण अयोध्या नगरी राममय झाली आहे. २२ जानेवारी २०२४ हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय दिवसांपैकी एक ठरला आहे. सोमवारी देशभरात रामललाचा अभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक संदर्भात संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. भारतातील विविध शहरांमध्ये या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरSocial Viralसोशल व्हायरलArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सAyodhyaअयोध्या