शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन वर्षांचे बालक बनलेय महाकुंभाच्या चर्चेचे केंद्र; नवस फेडण्यासाठी आई-वडील गेलेले सोडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:39 IST

Mahakumbh 2025: एवढे छोटे बाळ, त्याची दिनचर्या लाडावलेली असेल असे तुम्हाला वाटत असेल. परंतू तसे नाही. तो साधुसंतांसारखे वागतो म्हणूनच त्याला संत पद देण्यात आले आहे. एवढा लहान संत...

जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा महाकुंभाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. महाकुंभाची जागा ही वक्फ बोर्डाची असल्याचे दावे केले जात आहेत. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, आखाड्यांचे प्रमुख वक्फ बोर्डाच्या ताब्यात ही जमीन जाऊ देणार नाही, असे सांगत आहेत. अशातच अवघ्या साडे तीन वर्षांचा संत बनलेला गोंडस मुलगा चर्चेत आला आहे. 

या साडेतीन वर्षांच्या संत बालकाचे नाव श्रवण पुरी असे आहे. या बालकाला संत पदाचा दर्जा जुना आखाड्याने दिला आहे. कारण या बालकामधील लक्षणे ही साधु संन्याशांसारखीच आहेत. श्रवण हा जुना आखाड्याच्या अनुष्ठानात सहभागी होतो. आरती करतो. त्याचे वागणे इतर लहान मुलांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. तो चॉकलेटऐवजी फळे खाण्यास पसंती देतो. तो इतर गुरु बंधुंसोबत खेळतो. बोबड्या बोलामध्ये तो श्लोक, मंत्र म्हणतो. 

हा इथे कसा आला असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. हरियाणाच्या फतेहाबादमधील धारसूलच्या एका दाम्पत्याने फेब्रुवारी २०२१ मध्ये बाबा शाम पुरी यांच्या आश्रमात श्रवणला दान केले होते. तेव्हा या बालकाचे वय केवळ तीन महिन्यांचे होते. तेव्हापासून या आश्रमातील संतांनी त्याची काळजी घेतली, त्याच्यावर संस्कार केले. या दाम्पत्याचा कोणतातरी नवस पूर्ण झाला होता, तो फेडण्यासाठी त्यांनी या बालकाला दान केले होते. 

संत आणि गुरु बंधुंसोबत तो राहतो. यामुळे त्यांचेच अनुकरण करत आहे. गुरुबंधू त्याची काळजी घेतात. यामुळे तो आध्यात्मिक झाला आहे. एवढ्या छोट्या वयाच्या संताला पाहून लोकही हैराण होत आहेत. 

कशी आहे दिनचर्या...एवढे छोटे बाळ, त्याची दिनचर्या लाडावलेली असेल असे तुम्हाला वाटत असेल. परंतू तसे नाही. आता थंडीचे दिवस आहेत म्हणून श्रवणला पहाटे पाच वाजता झोपेतून उठविले जाते. नाहीतर इतर दिवशी त्याला पहाटे चारलाच उठविले जाते. जुना आखाड्याचे महंत कुंदन पुरी सांगतात की, मुलांमध्ये देव असतात. हीच मुले साधुच्या रुपात आली तर ती जगासाठी कल्याणकारी ठरतात. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशKumbh Melaकुंभ मेळा